८६ हजाराचा गांजासह दोन जणांना अटक, वासिंद पोलीसांची कामगिरी
वासिंद पोलीसांनी पकडला ८६ हजाराचा  गांजा ; दोन जणांना अटकशहापूर
मुंबई नाशिक महामार्गावरील हॉटेल फूडमॅक्स जवळ रविवारी रात्री नाकाबंदी करीत असलेल्या वासिंद पोलीसांनी पळून जाणाऱ्या संशयीत मोटार सायकलचा पाठलाग करत आरोपींना पकडले असून त्यांच्या जवळील १ लाख ४१ हजार ८४५ रुपये किंमतीचा गांजा व मोटार सायकल जप्त केली आहे.  वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून  दोन आरोपींना अटक केली असल्याची माहिती वासिंद पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सुदाम  शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. 


रविवारी रात्री ११.१५ च्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरील हॉटेल फूडमॅक्स जवळ नाकाबंदीवर असलेल्या पोलीसांना नाशिक कडून मुंबईच्या दिशेने एमएच ३९/एई ३६४९ या क्रमांकाची काळ्या रंगाची मोटारसायकलवर दोन इसम संशयितरित्या येत असतांना दिसले असता पोलीसांनी त्यांना थांबण्यास सांगितले मात्र ते न थांबता पोलीसांना हुलकावणी देत ठाणेच्या दिशेने पलायन करत असतांना वासिंद पोलीसांनी त्यांचा पाठलाग करत दहा गावच्या चढावर ओव्हरतेक करून त्यांना थांबिवले व चौकशी केली असता त्यांच्याकडील सॅगची झडती घेतली असता सॅगमध्ये ८६ हजार १७५ रुपये किंमतीचा ५ किलो ७४५ ग्राम गांजा मिळाला असून त्यांनी वापरलेली मोटारसायकल तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ४१ हजार, ८४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे


 आरोपी वसंत सुरेश भोसले (२३) राहणार मुक्काम जाम, पो. जावदे हवेली, ता. शहादा, जिल्हा नंदूरबार, दुसरा आरोपी तुळशीराम देविदास पावरा (२४), राहणार मुक्काम  गदडदेव, पो. बोराडी, तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांचेवर वासिंद पोलीस ठाणे गुन्हा नोंद ११२/२०२० एन. डी. पी.एस. कायद्याअंतर्गत कलम ८(क), सह २०, २९ अनव्ये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती वासिंद पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सुदाम  शिंदे यांनी दैनिक जनदेश प्रतिनिधीला दिली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण स्मिता पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहापूर विभाग नवनाथ ढवळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम  शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गुरव, प्रमोद जाधव, सहाय्यक फॊजदर के. एल. पटेकर, पोलीस हवालदार महेश वाघ, पोलीस नाईक सचिन घुगे, किरण खडताळे, पोलीस शिपाई एकनाथ नांगरे, चालक पोलीस शिपाई पंकज घुगे यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे करीत आहेत.  

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA