Top Post Ad

असंघटित आणि कचरा वेचक नाका कामगार कुटुंबातील मुलांसोबत बालदिन साजरा

संकल्प अभ्यास वर्गात उत्साहात बालदिन साजरा करण्यात आलामुंबई
संकल्प संस्थेच्या माध्यमातून आणि जनजागृती विध्यार्थी संघ यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक-१४ नोव्हेंबर रोजी मो. रफी नगर पार्ट नं २ , शिवाजी नगर गोवंडी मुंबई - ४३ या ठिकाणी संकल्प संस्थाचे अध्यक्ष विनोद हिवाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील असंघटित आणि कचरा वेचक नाका कामगार, कष्टकरी कामगार तथा रोजंदारी कुटुंबातील मुलाकरिता बालदिन साजरा करण्यात आला,या कोरोना काळात मुलांचे बालपण केव्हाच हरवून गेले होते पण या बालदिनाच्या निमित्ताने संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. 


कोरोना महामारीमुळे हातावर पोट असणारे गोरगरीब बांधव गेली ८ महिने सर्व कामधंदा बंद करून घरात बसली आहे; रोजगार नसल्यामुळे घरात आर्थिक चणचण होत आहे दोन वेळेचे जेवण हि त्यांना उपलब्ध होत नाही अशा प्रसंगी संकल्प संस्थाच्या माध्यमातून ८ महिने ५००० व्यक्तींना दररोज दोन वेळेचे जेवण देण्याचे काम केले आहे. त्यात शिवाजी नगर गोवंडी, वाशीनाक चेंबूर आणि कुर्ला विविध वस्त्यांचा समावेश आहे . एवढेच नाही तर विविध दात्यांच्या मदतीने ८००० लोकांना महिन्याभराचे राशन वाटप करण्यात आल, १०,००० महिलांना ४ महिने पुरेल इतके सॅनिटरी पॅड आणि १५,००० लोकांना फेस मास्क वाटप करण्यात आले सोबतच ५००० कोलगेट वाटप करण्यात आले, सदर जनहितदायी कार्यास विविध कंपन्या, सेवाभावी दानवीर, परिचयाचे मित्र आणि जे लोक संस्थेच्या कामाशी परिचित आहेत अशा लोकांनी आर्थिक मदत केली.शाळा बंद ऑनलाइन शिक्षणाची पद्धत त्यात रोजगार नसल्याने शिक्षणासाठी वह्या पुस्तके आणि शालेय  वस्तू आणायच्या कुठून या सर्व प्रशांवर सर्व वस्त्यातील पालक वर्ग गरीब आणि श्रमिक वर्ग चिंतेत आहेत.अशा प्रसंगी संकल्प संस्था आणि जनजागृती विद्यार्थी संघ च्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले . त्यात वह्या , लॉन्ग बुक , कंपास पेटी , कलर बॉक्स , पेन , पेन्सिल इ . साहित्य  इयत्ता १ली ते १० वी तील विद्यार्थ्यांना  याचा लाभ झाला .या कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन अरुणा मोरे यांनी केले.


संकल्प अभ्यास वर्गातील मुलांनी कार्यक्रमा मध्ये सामील होऊन खूप उत्साहात मध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत होते आम्ही सुद्धा आमच्या बालपणाची आठवण करून मुलानं बरोबर मज्जा करीत  होतो,अंधार्या वस्तीत एक दिवा आम्ही लावू शकलो हा सार्थ अभिमान एक नवी उमेद देऊन गेला...सदर शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबईतील आरिन  फाऊंडेशन ने सहकार्य केले .या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री.नितेश मिसाळ अध्यक्ष आरिन फाऊंडेशन श्री.संतोष सुर्वे सेक्रेटरी जनजागृती विद्यार्थी संघ. श्रीमती गीता सुर्वे,श्री. प्रजीत गायकवाड  श्रीमती लोकरे , इसुफ शेख तसेच संकल्प चे सहकार्य सविता हॅन्डवे,सीमा आणि बाली उपस्थित होते . या  प्रसंगी सर्व विदयार्थ्यांच्या हसरी मुद्रा होती मूल सर्व खूप खुश होती काही मुलांनी बालदिनावर कविता वाचन सादर केली आणि बालदिन च्या निमित्ताने भाषण केले  विशेष सहकार्य सतिश ढेरे स्मिता कवडे, मुस्लिम शेख आणि सिराज शाह यांचे लाभले, या कार्यक्रमाची सांगता समारंभ आणि आभार प्रदर्शन विनिता सावंत यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1