Top Post Ad

घरातच राहून सुरक्षितरीत्या दिवाळी साजरे करणे याला सर्वांनी  प्राधान्य द्यावे.: पालकमंत्री

आरोग्यमय दिवाळी साजरी करा: पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे जिल्हावासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!


ठाणे
आपल्या जिल्ह्यात  कोरोनाचा वाढता संसर्ग काही प्रमाणात रोखण्यास आपण सर्वजण यशस्वी होत आहोत; परंतु या विषाणूचा धोका अजून पूर्णतः टळलेला नाही.  आपले दुर्लक्ष अथवा बेजबाबदारपणा कोरोनावाढीस कारणीभूत होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यायची आहे. तुम्ही सर्वजण खबरदारी घ्या जबाबदारी आम्ही घेतली आहे. गेली आठ महिने जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा आपल्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. त्यांच्यावरचा ताण  वाढू न देणे आपल्या हातात आहे.घरातच राहून सुरक्षितरीत्या दिवाळी साजरे करणे याला सर्वांनी  प्राधान्य द्यावे. कोरोनाला  हरवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला  संयम आणि नियम पाळणे आवश्यक आहे.  त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करुया. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवूया, असे आवाहन करुन पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिवाळीच्या जिल्हावासियांना शुभेच्छा  दिल्या आहेत.


       दिवाळी सणात फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. कारण कोरोनाचा विषाणू हा फुफ्फुसावर मारा करीत असतो, त्यामुळे कोरोनाबाधित आणि कोमॉर्बिड लोकांना या धुराचा त्रास होण्याची शक्यता जास्त असल्याने मोठ्या आवाजाची व प्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांचा वापर कमीत कमी करावा. तसेच फटाके फोडताना लहान मुलांची काळजी घेण्यात यावी आणि सॅनिटाईजर हे ज्वलनशील असल्याने फटाक्यांजवळ सॅनिटाईजरचा वापर करू नये. दिवाळीचा सण आनंदात व उत्साहात साजरा करण्यासाठी शासनास व प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करण्याचेही आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केले आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. जेणेकरून दिवाळी सणांच्या दिवसात मास्कचा वापर करून स्वतःसोबत इतरांच्याही आरोग्याच्या रक्षणाची जबाबदारी घ्या असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.


 


*त्रिसूत्रीचे नियम पाळून दीपोत्सव आनंदाने साजरा करा – 
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष यांचे आवाहन*


ठाणे
चैतन्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या दिवाळी या सणाला सुरुवात झाली आहे. यंदाचा प्रकाश उत्सव अर्थात दीपोत्सव साजरा करताना करोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन  त्रिसूत्रीचे नियम पाळून दीपोत्सव आनंदाने साजरा करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुषमा लोणे,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केले.त्यांनी ग्रामीण जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.


ही दिवाळी आपण सर्वांनी आपली वैयक्तिक, कौटुंबिक, आणि सामाजिक जबाबदारी समजून फटाकेविरहीत, प्रदूषणमुक्त, शासकीय नियमांचे आनंदाने पालन करीत उत्साहाने साजरी करूयात. जिल्हा परिषदेच्या कर्मचारी- अधिकारी आणि पदाधिकार्यांनी कोरोनाच्या संकटाला मोठ्या धौर्याने तोंड दिले आहे. त्यामुळेच महामारीला आटोक्यात आणण्यात आपणाला यश आले. मात्र हा लढा अजून संपलेला नाही. सणाच्या काळात बाहेर जाताना हात वारंवार धुवा, तोंडाला मास्क लावा आणि सुरक्षित अंतर राखा. आपली आणि कुटुंबाची काळजी घ्या. शून्य कोरोना रुग्ण हे आपले ध्येय असून त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरु असून आपण त्यात नक्कीच यश मिळवू. असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com