मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठानची ग्रामिण क्षेत्रात स्थापना

मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान - MDSP


मंडणगड
 मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान - MDSP  गेली ७ वर्ष अगदी सक्रिय कार्य करत आहे. प्रतिष्ठानच्या यशस्वी वाटचाली नंतर सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग अनेक कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आणि सहकार्याने   ३० ऑक्टोबर २०२० रोजी प्रतिष्ठानची ग्रामीण भागात स्थापना करण्यात आली.  डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह , मंडणगड या ठिकाणी  आपल्या सर्व सभासदांच्या संमतीने अध्यक्ष.अरविंद येलवे ,उपाध्यक्ष.विजय खैरे सचिव .दयानंद लोखंडे , सहसचिव.रंजीत येलवे,कोषाध्यक्ष.प्रशांत मर्चंडे,हिशोब तपासणीस.अतिश जाधव,संघटक.सुमित खैरे ,सल्लागार.सुशांत पवार,अनिल साखरे ,अल्पेश सकपाळ यांची निवड करण्यात आली. या सभेला मुंबई कार्यकारणी कमिटीचे सभासद आयु.सुनील तांबे -कोन्हवलीकर ,उज्जल खैरे, सुशील मोरे उपस्थित होते. 


   आपल्या प्रतिष्ठानमध्ये असलेले समविचारी तरुण आणि तरुणांना समजून घेणारे तसेच विचार मांडण्याचे स्वातंत्र देणारे कार्यकारिणी मंडळ. युवकांच्या विचारांचे एक विचारपीठ जिथे युवकांना आपले विचार मांडण्यास कायम संधी मिळते.  म्हणूनच आता आपण या प्रतिष्ठान अंतर्गत ग्रामीण ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून तरुणांना आपले विचार मांडण्याची संधी देत आहोत त्यामुळे बहुसंख्य तरुणांनी आपल्या या प्रतिष्ठानमध्ये सहभागी होऊन आम्हांस सहकार्य करावे. असे आवाहन मुंबई कार्यकारणी कमिटीचे सभासद आयु.सुनील तांबे -कोन्हवलीकर  यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad