Trending

6/recent/ticker-posts

रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदाराची भागीदारी

रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदाराची भागीदारी


मुंबई
'दिवंगत अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मधे आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध आहे' 'अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे.' असा आरोप सचिन सावंतांनी भाजप आणि फडणवीसांवर लावला आहे.


अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आल्यानंतर भाजप सातत्याने महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या ठाकरे कुटुंबावर अनेक आरोप लावत आहेत. दरम्यान आता सचितन सावंतांनी किरीट सोमय्यांना सुनावले आहेत. तसेच फडणवीस सरकारच्या काळात हे प्रकरण का दाबण्यात आले होते. याचे कारण सचिन सावंतांनी सांगितले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किल्ल्यानजीक कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली आहे. माझी सासुरवाडी तेथून जवळच आहे, त्यामुळे आपणाला त्याची माहिती आहे, असा दावा सोमय्या यांनी केला होता. यावर नाईक कुटुंबीयांनी उत्तर देत हे सर्व व्यवहार खुले असल्याचे म्हटले आहे.


 

 

Post a Comment

0 Comments