गांधी जयंती निमित्त उरण आमदारांचा महिलांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन

गांधी जयंती निमित्त उरण आमदारांचा महिलांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजनउरण
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक उपक्रम म्ह्णून आमदार महेश बालदी ह्यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता पार्टीच्या उरण तालुका अध्यक्षा राणी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंदजी गावंड यांच्या निवासस्थानी  महिला भगिनींना विविध विषयावर  मार्गदर्शन करण्यासाठी एका उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  राणी म्हात्रे यांनी महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.या उपक्रमात  भारतीय जनता पार्टी - पिरकोन च्या सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या.


गणेश बचत गटच्या  सर्व भगिनी आणि असंख्य भाजपा महिला कार्यकर्त्या ह्यांना यावेळी अनमोल मार्गदर्शन पर माहिती देण्यात आली. महिला बचत गट आणि महिला सक्षमीकरण माहितीतून बरेच न्यायिक डावपेच, सरकारी योजना , त्यातील त्रुटी व उपाय आणि त्यांचे होणारे उज्वल भविष्यातील फायदे ह्या सर्वांची अगदी साध्या भाषेत माहिती राणी म्हात्रे यांनी उपस्थितांना दिली .ह्या छोटेखानी समारंभात  गणेश महिला मंडळ बचत गटाच्या अध्यक्षा लक्ष्मी गावंड, सचीव बिंदू गावंड, खजीनदार शिल्पा गावंड, राजश्री म्हात्रे- ग्राम पंचायत सदस्या, मालूबाई गावंड,अलका गावंड,बेबी गावंड,योगीता गावंड,कविता गावंड,आविशा गावंड,अक्षता गावंड,मयुरी गावंड,सारीका गावंड, प्रिया गावंड, अनिता गावंड, वर्षा घरत, भाजप - पिरकोन गाव अध्यक्ष सुनील घरत, रवी म्हात्रे-तालुका पदाधिकारी,मंगेश गावंड-जेष्ठ कार्यकर्त, ओ.बि.सी.सेल सचीव प्रमोद सर,जेष्ठ कार्यकर्ते गजानन गावंड,अंनत गावंड, कल्पेश गावंड-युवा कार्यकर्ते आदी..हजर होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad