उरण तालुक्यातील भेंडखळमध्ये मिनी ओपन जिम व बेंचेसचे लोकार्पण.

उरण तालुक्यातील भेंडखळमध्ये मिनी ओपन जिम व बेंचेसचे लोकार्पण.उरण
जेष्ठ नागरिकांना आनंदाने जीवन जगता यावे,त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहावे.जेष्ठ नागरिकांना निरोगी आरोग्याच्या दृष्टिने व्यायामाचे महत्व समजावे या दृष्टिकोणातुन उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील  प्रतापपाडा रोड येथे मिनी ओपन जिम तसेच आसन व्यवस्था म्हणून बेंचेसचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जेष्ठ नागरिकांसाठी मिनी ओपन जिम व बेंचेसचे लोकार्पण सोहळा प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटिल, विजय विकास सामाजिक संस्थेचे विकास भोईर, उरण पंचायत समितीचे सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते सागर कडु,आय काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष-मिलिंद पाडगावकर, गणेश म्हात्रे, राष्ट्रवादी तालुकध्यक्ष मनोज भगत,आय काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष जे डि जोशी,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राकेश भोईर,भेंडखळ ग्रामपंचायतचे उपसरपंच लक्ष्मण ठाकुर, काँग्रेसचे जेष्ठ नेते जनार्दन भोईर, काँग्रेसच्या जेष्ठ पदाधिकारी संध्या  दिपक ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल माळी,यशवंत म्हात्रे, किरण घरत तसेच जेष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.


सर्वप्रथम भेंडखळ गावातील कोरोना रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना 2 मिनिटे श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल ठाकुर यांनी केले. जेष्ठ नागरिकांना आज अनेक विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांचे शारीरिक व मानसिक खच्छिकरण केले जात आहे. अनेक ठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात व जेष्ठ नागरिक त्या उपक्रमात आनंदाने सहभागी होताना दिसुन येतात मात्र त्यांची दूसरी बाजू सुद्धा प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे.अनेक जेष्ठ नागरिक आज एकाकी जीवन जगत आहेत. जेष्ठ नागरिकांना आज अनेक समस्या आहेत पन ते समस्या जेष्ठ नागरिक कोणाला सांगत नाहीत, आपल्या सुख दुखाच्या भावना जेष्ठ नागरिक लपवुन ठेवत आहेत त्यामुळे त्यांना फ्रेश वातावरण भेटावे, थोड्या वेगळ्या पद्धतीने जीवन जगता यावे, त्यांना सुख दूख व्यक्त करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे,जेष्ठ नागरिकांचे मानसिक व शाररिक आरोग्य निरोगी रहावे या दृष्टि कोनातुन त्यांना आधार देण्यासाठी युवक संघटना भेंडखळच्या माध्यमातून ओपन जिमचे उद्घाटन व बेंचेसच्या व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात येत असल्याचे अनिल ठाकुर यांनी सांगितले.


प्रशांत पाटिल, मिलिंद पाडगावकर, गणेश म्हात्रे, विकास भोईर, सागर कडु आदि विविध मान्यवरांच्या हस्ते जिमचे व बेंचेसचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रत्येक मान्यवरांनी आपापले मत व्यक्त केले. शेवटच्या भाषणात प्रशांत पाटिल यांनी भेंडखळ गावातील अनिल ठाकुर, मनोज भगत तसेच युवक संघटना भेंडखळ यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व सर्वतोपरि सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थितां समोर दिले. या कार्यक्रमास उपस्थित असलेले जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष-के एस ठाकुर, उपाध्यक्ष-व्ही एन भगत, उपाध्यक्ष-उद्धव घरत, अनंत ठाकुर, सेक्रेटरी-जनार्दन म्हात्रे, सल्लागार-रमेश ठाकुर, सहसेक्रेटरि-नरेश ठाकुर,सचिव-पंढरीनाथ भगत यांनी उपस्थितांचे या सामाजिक योगदाना बद्दल सर्वांचे आभार मानले. प्रतिनिधिक स्वरूपात जेष्ठ नागरिक संघाचे सहसेक्रेटरि नरेश ठाकुर यांनी प्रत्येकाचे आभार मानले. भेंडखळ गावातील युवक संघटनेचे प्रमुख अनिल ठाकुर यांनी तसेच युवक संघटनेचे कार्यकर्ते तथा सदस्य-सूरज ठाकुर, अमेश ठाकुर, भावनेश ठाकुर, कविश ठाकुर, मिलिंद ठाकुर या सर्वांनी स्वतः पुढाकार घेवून जेष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम व बेंचेसचे व्यवस्था केल्याने अनिल ठाकुर व युवक संघटनेचे सर्व सदस्य-कार्यकर्ते यांच्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA