Top Post Ad

महिला व बालकल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे यांनी केली अंगणवाडींची पाहणी
महिला व बालकल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे यांनी अंगणवाडींची केली पाहणी

 


शहापूर
अंगणवाडी कार्यकर्ती व अंगणवाडी मदतनीस या नक्की काय काम करतात तसेच त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे महिला व बालकल्याण समिती सभापती रत्नप्रभा भगवान तारमळे यांनी मंगळवारी अचानक वासिंद ग्रामपंचयातला भेट देत वासिंद शहरातील अंगणवाडींची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद ठाणे महिला व बालकल्याण समिती सभापती रत्नप्रभा  तारमळे, भगवान तारमळे, पत्रकार संजय भालेराव, किरणकुमार थोरात, वासिंद ग्रामपंचायत सरपंच लता शिंगवे, ग्रामविकास अधिकारी ए. जे. थोरात, सदस्य मयुरी शेळके, काळूराम पवार, वासुदेव काठोळे आदी उपस्थित होते.

 

यावेळी सभापती तारमळे यांनी वासिंद शहरातील एकूण आठ अंगणवाडींची प्रत्यक्ष अंगणवाडी कार्यकर्त्यांशी चर्चा करून काम काज कसे चालते व कसे चालले पाहिजे याचा सविस्तर आढावा घेतला तसेच अंगणवाडी कार्यकर्ती व अंगणवाडी मदतनीस यांना येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करून त्यांना हवी असलेली सर्व मदत करण्याचे आश्वासन देत त्यांना मिळणारे मानधन वाढण्यासाठी प्रयत्न करणार असे देखील सांगितले व आठही आंगणवाडीचे काम चांगले आहे अशी शाबासकीची थाप देखील अंगणवाडी कार्यकर्त्यांना दिली. याप्रसंगी अंगणवाडी कार्यकर्ती भारती मोरे, रोहिणी माळी, अपर्णा शेलार, वसुधा भोईर, निलम कोंडलेकर उपस्थित होत्या.  प्रथमच सभापतींनी अंगणवाडींना प्रत्यक्ष भेट देत कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या म्हणून अंगणवाडी कार्यकर्ती भारती मोरे यांनी जिल्हा परिषद ठाणे महिला व बालकल्याण समिती सभापती रत्नप्रभा  तारमळे यांचे विशेष आभार मानले.


 

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com