Trending

6/recent/ticker-posts

त्या रिक्षाचालक महिलेला न्याय देण्यासाठी वंबआच्या महिला आघाडीचा पुढाकार


त्या रिक्षाचालक महिलेला न्याय देण्यासाठी वंबआच्या महिला आघाडीचा पुढाकार

 


 

ठाणे

ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरांमधील राहणाऱ्या शितल बनसोडे व्यवसायानी रिक्षा चालवतात, दिव्यामधील एका बिअर शाॅपच्या मालकाने व त्यांच्या साथीदारांनी आमच्या दुकानासमोर गाडी का लावते या शिल्लक कारणांवरून वाद करून महिलेला जबर मारहाण केली. रिक्षा स्टॅन्डवर गाडी लावली असुन देखील विनाकारण महिलेला त्रास देण्यात आला. सदर बाब सोशल मिडीयावर व्हायरल झाला. पिडीतेवर झालेला अन्याय व्हीडीओच्या माध्यमातून त्यांनी सोशल मिडीयावर सांगितला होता. 

 

याची दखल घेत त्या पिडीत महिलेला न्याय मिळावा यासाठी आज दिनांक ९ ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्तेनी तात्काळ पिडीतेची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. तात्काळ कळवा पोलिस उपायुक्तची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी ठाणे महिला जिल्हा अध्यक्षा सन्माननीय सौ. माया कांबळे,  उपाध्यक्ष अॅड. रजनी आगळे, सचिव रेखा कुरवारे, पुजा कांबळे, वंबआ चे कल्याण ग्रामीण चे मा.उमेदवार अमोल केंद्रे, अश्विनी केंद्रे, सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा उपाध्यक्ष इंजि.रुपेश हुंबरे वंबआ मा. कल्याण शहर अध्यक्ष नितीन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाघ ,हर्षल बनसोडे, रोहित कांबळे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  

Post a Comment

0 Comments