Trending

6/recent/ticker-posts

वडाळ्याचे सिद्धार्थ विहार, दादरचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आता चैत्यभूमी... 

वडाळ्याचे सिद्धार्थ विहार, दादरचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आता चैत्यभूमी... 


मुंबई
चैत्यभूमी ही जनतेच्या दानातुन भैय्यासाहेब आंबेडकरांनी उभी केली असून चैत्याच्या उभारणीपासुन देखभाल, व्यवस्था आणि नियोजन भारतीय बौद्ध महासभा करीत असतांना आठवलेंनी चैत्यभूमीबाबत समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नये, राजकारण करू नये असा इशारा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी दिला आहे. सद्या समाजात अनेक गंभीर प्रश्न उभे असतांना केंद्रिय मंत्री रामदास आठवले ‘‘चैत्यभूमी’’ या वास्तुच्या नूतनीकरणाबाबत बैठका आयोजित करून चैत्यभूमिबाबत समाजामध्ये संभ्रम निर्माण करुन, राजकीय खेळी करत आहेत काय? असा आरोप   भीमराव आंबेडकर यांनी केला आहे. 


यासंदर्भात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी  एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, "चैत्यभुमी" या वास्तुचे नूतनीकरण, या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी केले आहे, असे कळते. चैत्यभुमीची उभारणी जनतेच्या दानातून दिवंगत भय्यासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. चैत्यभुमीची जागा सरकारकडून घेण्यापासुन, चैत्याच्या उभारण्यापासून तर तिची देखभाल, व्यवस्था, नियोजन असे सर्व कार्य भारतीय बौद्ध महासभा करत आहे. चैत्यभुमीचे पावित्र्य राखुन सर्व धार्मिक कार्यक्रम गांभीर्याने व नियोजनबद्ध पद्धतीने दिवंगत भय्यासाहेब आंबेडकरांनंतर राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय बौद्ध महासभा करीत आहे.


"चैत्यभुमी" समुद्र किनारी आहे. त्यामुळे खारट वातावरणाचा परिणाम गेली ६० वर्षे चैत्यभुमीवर होत आहे. यावर्षी जोरांच्या पावसाळ्यात चैत्यभुमीत गळती झाली, त्याची लागलीच दुरुस्ती करण्यात आली. नव्याने चैत्यभुमी उभारण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. वास्तु विशारदाची नेमणुक करण्यात आली आहे. जी/ एन वार्डचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी बैठका झाल्या आहेत. चैत्यभुमीचा स्ट्रक्चरल रिपोर्ट तयार झाला आहे. "चैत्यभुमी" याच सद्यस्थितीतील वास्तुचे नुतनीकरण करावयाचे आहे की, नव्याने उभारायचे, याचा निर्णय सर्व सरकारी आस्थापना, मुंबई महानगरपालिका यांना विचारात घेऊन, लवकरच घेण्यात येईल.


"चैत्यभुमी" नव्याने उभारण्यासाठी भारतीय बौध्द महासभेचे चैत्यभूमीच्या नावाने "काही करोड़ रुपये" बैंकेत जमा आहेत. जशी भय्यासाहेब आंबेडकर यांनी जनतेच्या दानातुन चैत्यभुमी निर्माण केली, तशी भुमिका आज आमची चैत्यभुमीच्या नुतनीकरणाबाबत आहे. दादरच्या स्मशानभुमीतील 'तळ मजल्यावरील धर्मशाळा' तोडुन पहिल्या मजल्याची बांधुन चैत्यभुमीला झाकण्यात आले आहे. अनधिकृतपणे बांधण्यात आलेला पहिला मजला पाडण्याबाबतचे प्रकरण जी/एन वार्डचे सहाय्यक आयुक्त व मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे पाठवले आहे. परंतु अद्याप कारवाई झाली नाही.


 


Post a Comment

0 Comments