Top Post Ad

येणाऱ्या आठ दिवसात टॅंकर माफिया यांचे पितळे उघड करणार - मनसे

येणाऱ्या आठ दिवसात टॅंकर माफियांचे पितळ उघड करणार - मनसे



भाईंदर -
एकीकडे पावसाळा संपत नाही मात्र दुसरीकडे पाण्याची वाणवा. ठाणे शहराला अधून मधून पाऊस अद्यापही हजेरी लावत असला तरी ठाण्यातील मीरा भाईंदर परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष आतापासून सुरु झाले आहे. याबाबत  ठाण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मिराभाईंदर महानगर पालिका आयुक्त डॉ.विजय राठोड यांची भेट घेतली. यावेळी जाधव यांनी
टँकर माफियांना पाणी भेटते मग घरच्या नळाला पाणी का येत नाही, असा सवाल आयुक्तांना केला. तसेच शहरातील रखडलेल्या समस्यां, अनधिकृत बांधकामे, पाणी प्रश्न, कोविड संदर्भात, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यावरील खड्डे अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा केली असल्याची माहिती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. येणाऱ्या आठ दिवसात टॅंकर माफिया यांचे पितळे उघड करणार असल्याचेही जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मनसे कामगार नेते संदीप राणे उपस्थित होते.





शहरातील पाण्याचा प्रश्न जटिल होत चालला आहे. त्यात स्थानिक स्तरावरील सर्व राजकीय नेते आपली पोळी भाजत आहे. अमुक एमएलडी पाणी आणले. प्रत्यक्षात मात्र शहरातील नळाला ४० तासांनी पाणी येते,  मीरा भाईंदर शहरातील अनधिकृत झोपडपट्टी वाढत आहेत. परिणामी पाण्याचा प्रश्न जटिल होत चालला आहे. शहरात टँकर लॉबी सक्रिय आहे. तसेच प्रमुख रस्त्यावरील सिग्नल बंद आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी, सफाई कामगार, परिवहन सेवेतील कर्मचारी यांचा पगार रखडलेला आहे. या सर्व समस्यांबाबत आपण आयुक्तांशी बोललो असल्याचे जाधव म्हणाले.   शहरातील अनेक भागात अनधिकृत झोपडपट्टी बांधकामे वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात यांचा त्रास शहराला तसेच प्रशासनाला सुद्धा होणार आहे. मात्र, ज्यावेळेस हे अनधिकृत बांधकामे तयार होत असतात तेव्हा प्रभाग अधिकरी, प्रशासन कुठे असते? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वेळीच अनधिकृत बांधकामे अंकुश लावले तर येणारे संकट टळेल. तर याबाबतीत लवकरच पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे आयुक्त डॉ. विजय राठोड म्हणाले असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. 









 






 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com