Top Post Ad

भीमा कोरेगाव प्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी एनआयएच्या ताब्यात

 राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए)  भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या कटात सामील असल्याच्या आरोपाखाली सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.   झारखंडमधील नामकुम बगईचा येथील निवासस्थानावरून त्यांना ताब्यात घेतले. यावर्षी जानेवारीत एनआयएने हे प्रकरण घेतले. ऑगस्टमध्ये प्रथमच फादर स्टॅन स्वामी यांच्यावरही चौकशी केली गेली. मानवाधिकार कार्यकर्ते असणाऱ्या फादर स्टॅन स्वामी यांच्यावर आरोप आहे की, त्यांच्या आणि त्यांच्या साथिदारांच्या भाषणानंतरच 1 जानेवारी 2018 मध्ये भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार भडकला होता.

भीमा कोरेगाव प्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी एनआयएच्या ताब्यात

या प्रकरणात एनआयए दोन महिन्यांपूर्वी 6 ऑगस्ट रोजी फादर स्टॅन स्वामी यांच्या घरी पोहोचले होते आणि त्यांच्या निवासस्थानी सुमारे अडीच तास तपास करत चौकशी केली होती. या संदर्भात एनआयएपूर्वी महाराष्ट्र पोलिस संशोधन करत होते. यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी देखील दोनदा फादर स्टॅन स्वामी यांची चौकशी केली आहे. महाराष्ट्र पोलिस 28 ऑगस्ट 2018 रोजी प्रथम त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.  स्वामी यांना शुक्रवारी एनआयए न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते. फादर स्टेन स्वामी यांना रिमांडवर घेतले जाण्याची शक्यता आहे किंवा ट्रान्झिट रिमांडवर त्यांना दिल्लीला आणले जाऊ शकते. ते मूळचे केरळचे रहिवासी आहेत. यापूर्वीही स्वामींची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली होती.

फादर स्टेन स्वामी हे एक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी जवळपास पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलं आहे. झारखंडच्या आदिवासी क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी स्वामी यांच्या अटकेला विरोध सुरू केला आहे. ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. फादर स्टॅन स्वामी यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलं. त्यामुळेच मोदी सरकार अशा लोकांना गप्प करण्याच्या मागे आहे. कारण या सरकारासाठी कोळसा खाण कंपन्यांचा फायदा आदिवासींचं आयुष्य आणि रोजगाराहून अधिक महत्त्वाचा आहे, असं रामचंद्र गुहा यांनी म्हटल.

भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ने आठ जणांविरुद्ध १० हजार पानांचे आरोपपत्र विशेष एनआयए न्यायालयात शुक्रवारी दाखल केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

 
 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com