Trending

6/recent/ticker-posts

 कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

 कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश


बंगलोर
सुशांत सिंग प्रकरणी प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कंगना रानौत आपल्या प्रसिद्धीच्या हव्यासापायी एका प्रकरणात अडकली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी संसदेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्या विरोधावर टीका करताना कंगना हीने शेतकऱ्यांना लक्ष्य करत विद्द्वारे आंतकवादी असल्याची टीका केली. त्यावर तुमकूरू जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता त्यावरील सुणावनी दरम्यान न्यायालयाने कंगना हिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले.


महाराष्ट्र राज्य आणि बॉलीवूड विरोधात भूमिका घेतल्यामुळे कंगनाला भाजपाने पाठबळ दिले. इतकेच नव्हे तर तिला केंद्राकडे शिफारस करून वाय सुरक्षा प्रदान करण्यास भाग पाडले. त्याच भाजपची सत्ता असलेल्या एका राज्यात तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. राणावत हिने केलेल्या ट्विटच्या अनुषंगाने स्थानिक वकील रमेश नाईक यांनी प्रथम मॅजिस्ट्रेटकडे यासंदर्भात याचिका दाखल केली. त्यावर सदर न्यायालयाने कंगना राणावत हिच्या विरोधात एफआयआर दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे नाईक यांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments