दास्तान फाट्यावर रस्ता ओलांडणेकरिता उड्डाण पुल होणार - प्रशासनाचे आश्वासन
उरण
उरण तालुक्यातील दास्तान फाट्यावरुन नविन 10 पदरी लेनच्या महामार्गावर दास्तान फाट्यावर रस्ता ओलांडणेकरिता कोणत्याही प्रकारची उड्डाण पुलाची सोय नसल्याचे दिसून आल्यामुळे ऍड.दत्तात्रेय नवाळे यांचे सल्ल्याने सामाजिक कार्येकर्ते अजित म्हात्रे यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व जेएनपीटी प्रशासन यांना उड्डाण पूल बांधण्या करिता निर्वाणीचा इशारा दिला व आमरण उपोषणाची नोटिस दिली होती. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत या ठिकाणी लवकरच उड्डाणपुलाची निर्मिर्ती होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
10 पदरी लेनच्या महामार्गावर उड्डाण पूल नसल्यामुळे नागरिकांना दास्तान फाट्यावरील रस्ता ओलांडणे करीता 1 ते 2 कि.मी चा वळसा घालावा लागणार होता .तसेच सर्व नागरीकांना 9 मीटरचा फूट ब्रीज चढून उतरावा लागणार होता. त्याला अनुसरुन जेएनपीटी पीपीडी चे अधिकारी शेखर लागवणकर व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण चे अधिकारी आर एम जिरंगे यांनी ६ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष दास्तान फाट्यावर येऊन संयुक्तपणे पाहणी केली. आणि लवकरच दास्तान फाटा येथे उड्डाण पूल बांधून देण्याचे कबूल केले. तसेच शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचेही कबुल केले. सदरच्या मागणीचा पाठपुराव्या करिता कर्णीक शांताराम पाटील व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सुध्दा मोलाचे सहकार्य केले.
0 Comments