टोल दरवाढविरोधात मनसे आक्रमक


टोल दरवाढविरोधात मनसे आक्रमक


 

मुंबई

मुंबईत आजपासून टोलचे दर वाढले आहेत. टोलच्या दरात ५ ते २५ रूपयांची वाढ झाली आहे. याविरोधात मनसेने नवी मुंबईतल्या ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन करून टोल रद्द करण्याची मागणी केली. टोल मासिक पासाचे दरही वाढतील. त्यामुळे महागाईत अधिकच भर पडेल. एकीकडे रोज वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना सर्वसामान्य मुंबईकरांना आता मुंबईत प्रवेश करण्यासाठी वाढीव दराने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले, असे मनसेकडून सांगण्यात आले.

टोल दरवाढ सरकारने मागे घ्यावी म्हणून ऐरोली टोल नाक्यावर मनसेने आंदोलन करत वाहने मोफत सोडली. मात्र काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना बाजूला करत टोल नाका पुन्हा सुरु केला. यावेळी आज सौम्य आंदोलन करत असून भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिला आहे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad