Top Post Ad

अल्पसंख्यांक की शेड्यूल्ड कास्ट


 
"बौध्दांनी अल्पसंख्याक आयोगाची मागणी करन्यापुर्वी त्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या जातीच्या सवलती मधुन जे काही कमावले आहे, ते अनाथाश्रमला दान करावे." असा कोण म्हणु शकतो ? 
काय बाबासाहेबांना फॉलो करनारा म्हणु शकतो ? किंवा त्यांनी इंगित केलेल्या रस्त्यावरुन जान्याच्या प्रयत्नासाठी धडपडत असलेला म्हणु शकेल ?
बिलकुल नाही. मग कोण म्हणनार ?
ते हिंदु म्हणनार, जे बौध्दधर्मियाचा द्वेशच करत आलेले आहे. ज्यांना बौध्दांची प्रगती पाहू वाटत नाही. बौध्दांची नाळ कसे ही करुन महार जातीच्या रुपाने हिंदुधर्माशी जुळलेली राहावी, ह्या भाबड्या कल्पनेमध्ये रमुन असनारे म्हणतील.
किंवा 'बाळकृष्ण वासनिक',,,, सारखा महार जयचंदी जरुर म्हणेल. अश्यांना जेव्हा 'अल्पसंख्याक बौध्द' वाली गोष्ट माहीत पडली, तर त्यांची छटपटाहट तर होनारच. हे होउ नये म्हणुन नाना तऱ्हेने बौध्द जनतेला बरगळन्याचे काम करायला सुरुवात करनार. व वरिल प्रकारचे उद्गार काढून ते किती कोत्या मानसिकतेचे आहे, याचे प्रदर्शन पन घडवुन आनेल.
त्यांची ही छटपटाहट समजून शकतो.
 
बौध्दधर्माला जातीच्या नावाने आरक्षण देउन त्यांना कायमचे जातीमध्यच गुरफटत ठेवने, हा प्रतिक्रांतीवाद्याचा बामनी कावा आहे. पुढे हिंदुराष्ट्र बनविन्याच्या त्यांच्या कार्यात जर सर्वात मोठी अडचण कुणी असेल, तर तो आहे बौध्दधर्म. आजच्या स्थितीला बौध्दधर्मात धर्मांतरित होनाऱ्याची संख्या जरी वाढत असली, तरी सावरकरांच्या भाषेत सांगायचे म्हणजे "आखीर त्यांची उडी ही हिंदुधर्माच्या कुंपनाच्या आतच पडेल." याबद्दल ते शाश्वत असल्या कारणाने त्यांना काही विशेष अशी काळजी नसते. परंतु जर अल्पसंख्याक बौध्द म्हणुन जर एक स्वतंञ धर्म स्थापीत केला, तर ते कायमचे हिंदुधर्मापासुन दुर गेलेले असेल. व नंतर तर बौध्द धर्मात जानाऱ्याच्या संख्यामध्ये पन वाढ होईल, हे ते चांगले जानुन आहे. तेव्हा ते हे सहजासहजी कसे होउ देनार ?
 
मग जर का यासाठी बौध्दांकडून खटपटी व्हायल्या लागल्या की, वातावरण पुन्हा 1935 नंतरचे निर्माण होईल. लोकांना भडवल्या जातील. वस्ती वस्ती मध्ये जावुन लोकांना धर्मांतरांमुळे त्यांच्या जिवनावर होनाऱ्या दुष्परिणामाचे तिखट मिठ लावुन बखान करायचे. तुम्हचा नेता बाबासाहेब हा मुसलमानाला विकला गेला, असा खोटा प्रचार पन करु लागले. वृत्तपञातुन सुध्दा हाच अपप्रचार केला जायचा. यांच्या पाठीमागे कॉंग्रेस तर होतीच, परंतु त्यांच्या सोबत 'हिंदु महासभा' व त्यांचे जहाल कार्यकर्ते पन शामील होते.व सोबतच वरील प्रकारची मागणी करुन बौध्दांना भडकवन्याचे काम करतील.
तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. भल्या भल्यांची हिम्मत होत नसे बाबासाहेबासमोर कुण्या विषयावर हूज्जत करन्याची.
परंतु आज कोण आहे ? आणि म्हणुनच असल्या चिंधीचोरांचे फावले आहे.
 
यासाठी एका घटनेची आठवन करुन देने ठिक राहील.
21 ऑगस्ट 1955 मुंबई येथे बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेमध्ये 'आगामी निवडणुकीपुर्वी राजकिय राखीव जागा देन्याची पध्दत रद्द करन्याचा ठराव संमत केला होता.' तेव्हा बाबासाहेबांच्या ह्या निर्णयाविरुध्द नागपुरच्या बाळकृष्ण वासनिक नावाच्या अस्पृश्याने बाबासाहेबांच्या विरोधात जावुन, 'ह्या जागा आम्हाला पाहीजे, म्हणुन *Bhartiya Dipressed Classes League* च्या सेक्रेटरी च्या नात्याने निवेदन देउ लागला होता. त्यांचे ते निवेदन 'टाईम्स ऑफ ईंडिया' मध्ये पन प्रकाशीत पन झाले होते.  आज पुन्हा तोच वासनिक आपल्या नव्या नावासहित व नव्या संस्थेच्या रुपाने बाबासाहेबांच्या हेतुला विरोध करायला पैदा झाला आहे. त्यांचा पन फक्त आपलाच स्वार्थ होता, व आज जे पन करत आहे, त्याचा पन स्वार्थच आहे. त्याने पन आरक्षणाचे समर्थन करतांना बाबासाहेबांचा विरोध केला. हा पन आपल्या स्वार्थासाठी बाबासाहेबांच्या विचाराचा विरोध करित आहे.
 
त्यावेळच्या डिप्रेस्ड क्लास लिग चा बाबासाहेबांच्या संस्थेशी कसलाही संबंध नव्हता, तसाच ह्या वेळेस पन आपल्या स्वार्थासाठी फेसबुक वर उभ्या केलेल्या संस्थेचा आंबेडकरी संघटनेशी कसला संबंध राहनार ? नावात काही साम्य असल्यामुळे ती आंबेडकरी ठरते काय ? हे करुन लोकांना बेवकुफ नाही बनवत तर स्वत:च बेवकुफ बनुन जातो.
जास्त सस्पेंसमध्ये न ठेवता त्या संस्थेचे नाव आहे U B S I
"जसे बालकृष्ण वासनिक आणि त्याच्या टिमने राजकिय आरक्षण कायम राहावे म्हणुन बाबासाहेबांचा विरोध केला, तसाच विरोध आतापन अल्पसंख्यांक बौध्द ना बनावे म्हणुन ..म्हणजेच ऱाजकिय आरक्षण राहावे म्हणुन बाबासाहेबांच्या विचाराचा विरोध होत आहे."
सावध राहा..
कोणत्याही साम्राज्याला नुकसान हे त्यांचे आतील शञुच करित असतात, जे जयचंदीच्या रुपाने तुम्हच्या अवती भवती मौजूद असतात.
 
- प्रकाश तक्षशील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com