सेफ्टी टॅंकमध्ये मृत्यू झालेल्या कामगारांना तात्काळ भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

सेफ्टी टॅंकमध्ये मृत्यू झालेल्या कामगारांना दोन महिन्यात भरपाई द्या
केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सचिवांचे जिल्हाधिकार्यांना आदेशठाणे
सेफ्टी टॅंकची स्वच्छता करतांना गुदमरून मृत्यू झालेल्या सफाई कर्मचार्यांच्या कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, तसेच कोरोना काळात कर्तव्य बजावतांना मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कामगारांना राज्य शासनाच्या आरोग्य विम्याची 50 लाखांची रक्कम मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासानाने पाठपुरावा करावा, असे आदेश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सचिव नारायण दास यांनी बुधवारी दिले. 
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या वतीने दास हे बुधवारी जिल्हा दौर्यावर आले होते, जिल्हा प्रशासन तसेच महापालिका अधिकार्यांच्या समवेत त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते


सफाई कर्मचार्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी त्यांनी चर्चा  केली. गेल्या 3- 4 वर्षात सेफ्टी टॅंकमध्ये गुदमरून मृत्यू झालेल्या 14 कामगारांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 लाख रूपयांची नुकसान भरपाई तसेच त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन तातडीने करण्याचे आदेश दास यांनी  दिले. सेफ्टी टॅंक मध्ये मृत्यू झालेल्या 14 पैकी   3 च कामगारांना भरपाई देण्यात आलेल्या उर्वरति 9 कर्मचार्यांना ही भरपाई सरकारी नियमाप्रमाणे त्वरीत भरपाई देण्याचे सूचना त्यांनी केल्या.कोरोना दरम्यान कर्तव्य बजावतांना मृत्यू  झालेल्या सफाई कामगारांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या आरोग्य  विमा योजनेतंर्गत 50 लाखांची भरपाई देण्याच्या सूचनाही दास यांनी केल्या. याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. ठाणे जिल्ह्यात सफाई कर्मचार्यांच्या रिक्त झालेल्या 139 जागां भरण्याच्या आदेश दिल्याचे दास यांनी सांगितले.  यावेळीराष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सल्लागार पुरन सिंह, अखिल भारतीय सफाई मजदूर परिषदेचे अध्यक्ष बलवीर वैद उपस्थितीत होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA