कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही- मंत्री विजय वडेट्टीवार

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नागपूर व अमरावती विभागाला  ६१ कोटी ३२ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर   कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही- मंत्री विजय वडेट्टीवार 


मुंबई
राज्यामध्ये कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवित आहे.याच धर्तीवर मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नागपूर व अमरावती विभागाला ६१ कोटी ३२ लाख ७० हजार रुपयांचा निधी  मंजूर  करण्यात आला असून संबंधित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 


कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावतीसाठी १४ कोटी ३४ लक्ष ८९ हजार रुपये, यवतमाळ ५ कोटी १६ लक्ष ७२ हजार रुपये, बुलढाणा ३ कोटी २७ लक्ष १६ हजार रुपये, वाशिम १ कोटी ९८ लक्ष ३८ हजार रुपये, असा एकूण अमरावती विभागासाठी २४ कोटी ७७ लक्ष १५ हजार इतका निधी मंजूर झाला आहे. तसेच नागपूरसाठी १३ कोटी २२ लक्ष ०२ हजार रुपये, वर्धा ३ कोटी ७४ लक्ष १५ हजार, भंडारा ३ कोटी ४९ लक्ष ८४ हजार , गोंदिया - ४ कोटी ०३ लक्ष ३२ हजार, चंद्रपूर ४ कोटी ४५ लक्ष १४ हजार, गडचिरोली ७ कोटी ६१ लक्ष ०८ हजार असे एकूण नागपूर विभागासाठी ३६ कोटी ५५ लक्ष ५५ हजार इतका निधी मंजूर झाला आहे. नागपूर व अमरावती विभागाला  कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी एकूण ६१ कोटी ३२ लाख ७० हजार रुपयांचा निधी  मंजूर  झाला असून तो बीम्स प्रणालीवर आधारित आहे. 


कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांसाठी आतापर्यंत एकूण ४८५ कोटी १३ लक्ष इतका निधी विभागीय आयुक्तांमार्फत वितरित करण्यात आला असून  नागपूर ४८ कोटी रुपये, अमरावती २२ कोटी ६१ लक्ष रुपये, औरंगाबाद ५२ कोटी ५० लक्ष रुपये, नाशिक १८ कोटी ७० लक्ष रुपये, पुणे १०३ कोटी रुपये, कोकण २३५ कोटी २८ लक्ष रुपये, सार्वजनिक आरोग्य विभाग ५ कोटी ०४ लक्ष रुपये लअसे विभागीय आयुक्तांमार्फत आतापर्यंत कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकूण ४८५. १३  कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तरी येणाऱ्या काळात कोविडला हद्दपार करण्यासाठी ज्या उपाययोजना आवश्यक असतील त्या शासन स्तरावर तत्परतेने राबविल्या जातील यासाठी निधीची कमतरता पडू देणार असा विश्वास श्री.वड्डेटीवार यांनी व्यक्त केला आहे.
******
रेश्मा बोडके, जनसंपर्क अधिकारी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA