माननीय खासदार संजय राऊत संसदीय राजकारणात अस्पृश्यता व भेदभाव पाळु नका
कुठे आहेत आठवले? हे विचारताना तुम्ही व तुमचा पक्ष दलितांवर अन्याय व अत्याचाराच्या प्रश्नांवर कुठे आहे?
राजकारण व समाजकारणात दलित पॅथर चळवळीत आल्यापासून माननीय आठवले साहेब अत्याचाराच्या प्रश्नांवर काम करतच इथपर्यंत आलेत, हे माननीय संजय राऊत विसरले कसे?
- प्रविण मोरे.
झी 24 तास मराठी वाहिनीवर माननीय नामदार रामदास आठवले यांच्या विरोधात रिपोर्ट दाखवण्यात आला, उत्तर प्रदेश मधील भगिनीवर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंगाने बोलत असताना माननीय खासदार संजय राऊत यांनी व मराठी वाहिनीने 'कुठेआहेत आठवले?' हा प्रश्न उपस्थित करून ते आणि आम्ही हा फरक व वेगळेपण दाखवले. म्हणजे दलितांचा प्रश्न असेल तर दलित नेते कुठे आहेत हा प्रश्न उपस्थित करायचा आणि तुम्ही काय करता या बाबतीत हे विचारायचे नाही.
सदर अनुषंगाने, हे पहीले समजून घेतले पाहिजे की, उत्तर प्रदेश मधील अत्याचाराची घटना सर्वांनाच उशीरा समजली. मात्र समजल्या नंतर लगेच नामदार रामदास आठवलेंनी माध्यमातून आपला निषेध व दोषींवर कार्यवाहीची मागणी केली व मुंबईत आंदोलन जाहीर केले व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आजाद मैदान, गोरेगाव व ठिक ठिकाणी आंदोलन झाले. झी 24 तास मराठी वाहिनी व इतर माध्यमातून बातम्या आल्या आहेत. तसेच दिनांक 3 आॅक्टोंबर रोजी योग्य कार्यवाही होण्यासाठी उत्तर प्रदेशच्या महामहीम राज्यपाल महोदया आनंदीबेन पटेल व मा.ना.रमापति शास्त्री समाज कल्याण मंत्री, उत्तर प्रदेश यांची भेट घेतली आहे. फिल्म अभिनेत्री कंगना व पायल घोष ह्याचा विषय रिपब्लिकन पक्षाची कटिबंधता महिला संरक्षण असल्यामुळे ही भुमिका आधीच नेते व रिपब्लिकन पक्षाने भूमिका घेतली होती. झी 24 तास मराठी वाहिनी व खासदार संजय राऊत असे तर समजत नाहीत ना, की नामदार रामदास आठवलेनी व रिपब्लिकन पक्षांनी फक्त मागासवर्गीय महिलांचेच प्रश्न घ्यायचे इतर महिलांचे घ्यायचे नाहीत.
शिवसेना पक्षाचे लोकसभेमध्ये असणाऱ्या खासदारांनी किंवा तुमच्या राज्यांमध्ये सत्तेत असणाऱ्या प्रतिनिधिनी या बाबत काय भुमिका घेतली व कोणत्याही विषयावर ट्विट करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी या बहिणी वर अन्याय झाला त्याबद्दल ट्विट केलेलं वाचण्यात आलेला नाही. शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री यांनी निषेध केला का? त्यांच्या विषयावर काम करायला नको मात्र मुंबई व राज्याची सत्ता मिळवायला वाल्मिकी आणि बौद्धेतर दलित समुदायाची मत सत्ता मिळवण्यासाठी पाहिजे व त्यांचा वापर करता. त्यांचे लोकसभेमध्ये असणारे खुल्या जागेवरून येणारे खासदार व मागासवर्गीय खासदार दलित अत्याचाराच्या घटना व मागासवर्गीयांचे प्रश्न मांडलेले ऐकले नाही. त्यांना लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणून याच्यावर अंतर्मुख होऊन त्यांनी विचार करायला पाहिजे दलित अत्याचार झाला म्हणजे दलित नेत्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून टाकायचे.
तुम्ही हे प्रश्न उपस्थित मात्र करत नाही व तुम्ही त्याच्यावर काही भूमिका घेत नाही. राजकारणात राहुन अस्पृश्यता पाळतात का खा संजय राऊत? गोरगरीब दुर्बल घटकाचे संसदीय राजकारणामध्ये आपण प्रश्न मांडले पाहिजे ते सोडवले पाहिजेत. आपली राजकीय कटिबद्धता म्हणून पाळली पाहिजे. एवढं सुद्धा सामान्य-ज्ञान एका वर्तमानपत्राचे संपादक आणि राजकारणावर अनेक विषयावर भओळखब करणारा माणूस, महाराष्ट्रात सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणारा शिलेदार म्हणून त्यांची ओळखब असताना तुम्ही व झी 24 तास मराठी वाहिनी हा प्रश्न उपस्थित करता व दलितांच्यावर अत्याचार झाले तर दलित समाजाच्या प्रतिनिधीने बोलावं अशी केविलवाणे भाष्य करून स्वतःची जागा खऱ्या अर्थाने त्यांनी दाखवली आणि मला हा भेदभाव मान्य आहे हीच भूमिका त्यांनी घेतली असून या ठिकाणी मला म्हणावसं वाटतं. माननीय खासदार संजय राऊत संसदीय राजकारणात अस्पृश्यता व भेदभाव पाळु नका.
0 टिप्पण्या