Top Post Ad

हदरस घटनेचा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ठाणेच्या वतीने निषेध

हदरस घटनेचा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ठाणेच्या वतीने जाहीर निषेध
BJP खासदार उदयन भोसले यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचाही केला जाहीर निषेध !


ठाणे
BJP सरकार हे जातीयवादी आणि स्त्री विरोधी आहे हे या उत्तर प्रदेश मधील होणाऱ्या असंख्य घटनांवरून दिसते,तसेच BJP खा.उदयन भोसले यांचं आरक्षण विरोधी वक्तव्य हे OBC, ST, SC या सर्व समाजाच्या विरोधात जातीय मानसिकता दाखवते.म्हणून त्यांचाही जाहीर निषेध करण्यात आला!यावेळी उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून, आरोपींने तात्काळ अटक करून त्यांच्या विरोधात  जलदगती न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हाशी असे मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती यांना देण्यात आले .


उत्तर प्रदेशमधील हदरस भागातील एका गावात १९ वर्षांच्या मनीषा वाल्मिकी या दलित मुली बरोबर ही घृणास्पद आणि वेदनादायक घटना १४ सप्टेंबर रोजी घडली होती. मनीषा वाल्मिकी ही आपल्या आईसह शेतात पशुधन घेण्यासाठी गेली असता, त्याचवेळी त्याच खेड्यातील चार युवकांनी तिला शेतात खेचले आणि सामूहिक अत्याचार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदर घडलेल्या सामूहिक अत्याचार च्या घटनेत मनीषा वाल्मिकी हीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बहुजन रिपब्लिकनसोशालिस्ट पार्टी आक्रमक झाली असून, या घटनेला उत्तर प्रदेश मधील योगी सरकार जबाबदार आहे. म्हणून योगी -मोदी सरकार यांचा जाहीर धिक्कार पक्षाच्या वतीने करण्यात आला. 


बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP)चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.डॉ.सुरेश माने यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रमुख संघटक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात ठाणे जिल्हा अध्यक्ष ललित हुमणे,  ठाणे जिल्हा प्रभारी चंद्रभान आझाद, ठाणे शहर अध्यक्ष प्रभाकर जाधव, ठाणे मध्य विधानसभा नरेंद्र नाशिककर, ठाणे कोपरी पाचपाखाडी विधानसभा संतोष जगताप, ठाणे ओवळा माजिवडा विभानसभा अफजलभाई खान, ठाणे शहर सचिव बापुसाहेब तोरणे, नवी मुंबई अध्यक्ष नविन प्रतापे, उल्हासनगर अध्यक्ष हरेश ब्राह्मणे, महिला अध्यक्षा सुप्रिया/प्रियांका बागुल, अविनाश नाईक, कल्याण अध्यक्ष adv ललीतकुमार तायडे, विशाल तांबे, दर्शन हुमने,डोंबिवली युनिटचे अनिकेत पवार तसेच राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष ओबीसी सेल सुरेश पाटीलखेडे,  ब्ल्यू पँथर एस.रविराज, इसरा सामाजिक संघटनेचे सरचिटणीस भरत जाधव आदी मान्यवर सहभागी झाले होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com