‘‘मेरा पेट भरता, भले ही दुसरा तरसता’’ म्हणजे समरसता


 ‘‘मेरा पेट भरता, भले ही दुसरा तरसता’’  म्हणजे समरसतासमरसतेच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाना साधला असून समरता म्हणजे ‘‘मेरा पेट भरता, भले ही दुसरा तरसता’’ अशी प्रखर टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समरसतेच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


यासंदर्भात अँड. प्रकाश आंबेडकरांनी ट्वीट केलं आहे की, समरसतेच्या नावाखाली आरक्षण रद्द करण्याचे षडयंत्र आरएसएसचे आहे. समतावादी समाज व्यवस्थेच्या स्थापनेमध्ये सवलती कशा रद्द होतील या पलिकडे मोहन भागवत काम करीत नाहीत. मुळात समरता म्हणजे ‘‘मेरा पेट भरता, भले ही दुसरा तरसता’’ अशी जळजळीत टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकरयांनी केली आहे. 


वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोहन भागवत यांनी  समरसता या शब्दाचा अर्थ आणि उद्देश आपण सार्वजनिक करावेत. गेल्या 100 वर्षांमध्ये जातीभेद, अन्याय अत्याचार आपण थांबवू शकला असता परंतु आपले मुख्य धेय्य आरक्षण रद्द करणे एवढेच आहे. समरतेचं गोंडस नाव धारण करून केवळ सवलती नष्ट करण्याचा एक कलमी कार्यक्रम आरएसएसचा आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.  


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA