रायगड सुरक्षा मंडळाची अनोखी दिवाळी भेट.

न्हावा शेवा बंदर कामगार संघटना (अंतर्गत)ने पत्र देताच,सुरक्षा रक्षकांचा बोनस खात्यावर  झाला जमा...  रायगड सुरक्षा मंडळाची,सुरक्षा रक्षकांना,दिवाळीची अनोखी भेट.

 

उरण 

 रायगड सुरक्षा मंडळाच्या नोंदीत सुरक्षा रक्षकांना दरवर्षी 13.33 % इतका बोनस दिला जातो. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर , रायगड सुरक्षा मंडळाने,सुरक्षा रक्षकांना 25000 रुपये इतक्या बोनसचे वाटप,दिवाळीपूर्वीच  लवकर करावे,अशी मागणी आपल्या न्हावा शेवा बंदर कामगार संघटनेने आठ्वड्यापूर्वीच केली होती.मंडळाचे अध्यक्ष आनंद भोसले यांनी मागणीला  मान्यता देऊन गुरुवार दि.29 आक्टोंबर 2020 रोजीच बोनसची रक्कम सर्व सुरक्षा रक्षकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे...

 

यामध्ये सुरक्षा रक्षकांना 8.33% च्या हिशेबाने 12000 रुपये तर सुपरवायजरना 14000 रुपये इतकी रक्कम दिवाळी  बोनस म्हणून मिळालि आहे... त्याचप्रमाणे शैक्षणिक खर्चाकरता उपयोगात यावी याकरता उर्वरित 5% ची रक्कम जून च्या पहिल्या आठवड्यात वाटप करण्यात आली होती.. तेव्हादेखील सुरक्षा रक्षकांना 6000 रुपये तर सुपरवायजरना 7000 रुपये इतकी रक्कम वाटप करण्यात आली होती.. अशाप्रकारे रायगड सुरक्षा मंडळाने,यावर्षी त्यांच्या नोंदीत सुरक्षा रक्षकांना 18000 ते 21000 हजार रुपये इतका बोनस दिवाळीपूर्वीच वाटप केला आहे. यामुळे कोरोना महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या सर्व  सुरक्षा रक्षकानी आनंद व्यक्त करून रायगड सुरक्षा मंडळाचे आणि न्हावा शेवा बंदर कामगार संघटनेचे जाहीर आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA