Trending

6/recent/ticker-posts

सराईत चोरट्यांना १० तासांच्या आत अटक

रात्रीच्या वेळी दुकानांचे लोखंडी शटर तोडून चोरी करणा-या
४ सराईत चोरट्यांना १० तासांच्या आत अटकठाणे - कासारवडवली
पोलीस स्टेशन हद्दीतील कांचनपुष्प सोसायटी मध्ये 'सहकार सुपर बाजार' या दुकानाच्या बाहेरील बाजूस असलेले लोखंडी शटर उचकटून दुकानातील ड्रॉव्हरमध्ये किराणा मालाची विक्रीचे सुमारे दहा हजाराची रोख रक्कम दुकानातील टेप रेकॉरडर चोरी करणाऱ्यांना कासारवडली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्याकरिता  वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि सागर जाधव व त्यांचे पथक यांना सूचना देवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्याचप्रमाणे पोलीस पथकाने आरोपींचा शोध होणेकामी काशी-मीरा भिवंडी,वागळे इस्टेट इत्यादी परिसरात जावून तपास केला व घटनेबाबत बातमीदार यांना माहिती देवून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते.


२६ ऑक्टोबर रोजी  खैरनार यांना गुन्ह्यातील आरोपींबाबत गोपनीय व विश्वासहार्य माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तपास पथकास माहिती देवून केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस पथकाने आझाद नगर रोड या ठिकाणी नियोजनपूर्वक सापळा रचून सर्वेश अशोक गौड,वय-२१वर्षे,धंदा-मजूर, शंकर सुधाकर हनवते, वय-३० वर्षे,धंदा- रिक्षा चालक,  राहुल शिवाजी घोरपडे,वय-१९ वर्षे,धंदा- हाऊस कीपिंग, अक्षय सुरेश जाधव,वय-२७ वर्षे,धंदा-चालक,सर्व राहणार -वागळे इस्टेट,ठाणे यांना अटक केली.  त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा ८० हजार रुपये किमतीची, चोरीतील टेप रेकॉरडर  पाच हजार रुपये किमतीचा व २५००/-रोख रक्कम असा एकूण ८७,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


आरोपीना मा.न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक २९. ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर वागळे इस्टेट व श्रीनगर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असून यांनी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता असून त्याबाबत अधिक तपास सुरु आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार,पो.नि(गुन्हे)अविनाश काळदाते,स.पो.नि सागर जाधव,पोलीस हवालदार- एस.बी.खरात, आर.एस.चौधरी, चंद्रकांत गायकवाड,  आर.आर.पाटील, आर.एस महापुरे  गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या