Top Post Ad

जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर

प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा ला प्रथम क्रमांकाचा जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर

 

धसई, शिरोशी,  वाशिंद, डोळखांब, खडवली, दिवाअंजूर, पडघा, दाभाड, अनगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रशंसात्मक पुरस्कार 

 

ठाणे 
ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागातंर्गत येणाऱ्या 'प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा' या प्राथमिक आरोग्य केंद्राला सन २०१९- २० चा प्रथम क्रमांकाचा जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. तर मुरबाड तालुक्यातील धसई, शिरोशी, शहापूर तालुक्यातील वाशिंद, डोळखांब, कल्याण तालुक्यातील खडवली, भिवंडी तालुक्यातील दिवाअंजूर, पडघा, दाभाड, अनगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रशंसात्मक पुरस्कार जाहीर झाले. 
 

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, डॉ. मनीष रेंघे,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कायाकल्प कार्यक्रम राबवला जातो. या उपक्रमातर्गत जी प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयाची देखभाल, स्वच्छता, जैविक व्यवस्थापन, जंतुसंसर्ग व्यवस्थापन, सपोर्ट सर्व्हिसेस, स्वच्छता प्रसार, रुग्णालया बाहेरील स्वच्छता आदी निकष पूर्ण करतात त्यांना या पुरस्काराने गौरविले जाते. 

 

कायाकल्प कार्यक्रमासाठी विशेषत्वाने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ अंजली चौधरी, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र ठाणे डॉ.महेश नगरेवैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना गरुड,  कार्यक्रम सहाय्यक प्राची खर्डीकर तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारीआरोग्य कर्मचारी यांचे योगदान आहे.

 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com