"घरी तिथे शौचालय" कामांचा कोपरी कोळीवाडा येथे शुभारंभ
अनेक वर्षांपासून रखडलेले काम अखेर मार्गी
ठाणे
मागील अनेक वर्षांपासून कोपरी येथील चेंदणी कोळीवाडा, साईनगरी मधील शौचालयातील सांडपाण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात येथील नागरिकांची शौचालयबाबत सांडपाण्याची डोकेदुखी दूर होणार आहे. "घर तिथे शौचालय" या नव्या संकल्पनेच्या माध्यमातून स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने या कामाचा शुभारंभ झाला आहे. त्याचप्रमाणे या परिसरात नवीन पाण्याची लाईन देखील टाकण्यात येणार आहे. या योजनेमुळे कोपरी येथील 2500 घरांना याचा लाभ होणार आहे.
कोपरी खाडीलगत असलेल्या चेंदणी कोळीवाडा,साईनगरी विभागात ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भासवत होती. मागील काही वर्षात माजी नगरसेवकांनी आश्वासन तसेच पाठपुरावा केला होता. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणावरून ही योजना रखडली होती. अखेर सर्व्ह करून जमीन लेव्हल चा प्रश्न मार्गी लावून घेतल्यानंतर घरोघरी ड्रेनेज लाईन टाकून दिली जात आहे. त्यामुळे घराघरात शौचालय बांधण्याची सुविधा रहिवाश्यांना उपलब्ध झाल्याने अनेक वर्षाची कुचंबना थांबली असल्याचे यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार असून स्वच्छता अभियान अंतर्गत देखील हा उपक्रम राबविला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनेचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण याच्या हस्ते करण्यात आला असून, यावेळी ओंकार चव्हाण,अमरिश ठाणेकर, दशरथ साबळे,विद्या कदम,वरद कोळी,
सुवर्णा अवसरे, श्रुतिका कोळी,विशाल भंडाळे, राजेश घाडगे, सिद्धेश पिंगुलकर,कृष्णा भुजबळ, राहुल तमाईचिकर आदी जण उपस्थित होते.
0 टिप्पण्या