Top Post Ad

ओबीसीचा बॅकलाॅक तातडीने भरण्याबाबत शासन सकारात्मक

ओबीसीचा बॅकलाॅक तातडीने भरण्याबाबत शासन सकारात्मक, समीती नेमणूक करण्याबाबत शासन विचाराधीन 



मुंबई
ओबीसी समाजाच्या आरक्षण संबंधित विविध मागण्या मान्य होण्यासाठी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक आयोजित करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पावले उचलण्यात यावी अशी याचना चर्चेच्या माध्यमातून केली आहे.या मागणीला दुजोरा देत ओबीसीचा बॅकलाॅक तातडीने भरण्याबाबत शासन  सकारात्मक असून  त्यासाठी एक समीती नेमणूक करण्याच्या शासनाच्या विचारधीन असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले तसेच ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केले असल्याची माहिती  विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे. 
     
 ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक झाली. बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार,  परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि  ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसमवेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर या बैठीचे फलित म्हणून ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केले असल्याचे  विजय वड्डेटीवार यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या मागण्या या बैठकीत मुख्यमंत्रयांसमोर मांडण्यात आल्या तदनंतर ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. ओबीसी  मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,  ओबीसी चा बॅकलाॅक तातडीने भरण्याबाबत शासन  सकारात्मक राहील, त्यासाठी शासणाच्या वतीने एक समीती नेमणूक करण्याचे विचारधीन असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची सरकारला जाणीव असून त्याची पुर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल.असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले आहे.  या समितीने  ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तत्काळ घेता येतील त्याची  प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने  निधीसाठीही मागणी करतांना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत. तसेच टप्प्या टप्प्याने ओबीसी समाजाचे प्रश्न आपण नक्की मार्गी लावू असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.


दरम्यान केंद्र सरकारकडे मराठा आरक्षणाचा विषय संभाजीराजे यांनी न्यावा, त्याचे काम लवकर होईल, असा सल्ला देखील वडेट्टीवार यांनी दिला. विजय वडेट्टीवार यांनी संभाजीराजे यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना ओबीसीमध्ये मराठा समाजाला का समाविष्ठ करत नाही, असे मी खासगीमध्ये सुद्धा बोललो नाही. ओबीसीसाठी 27 टक्के कोटा आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही घ्या, असे मी संभाजीराजे यांना खासगीमध्ये सुद्धा बोललो होतो. पण राजेंचा गैरसमज झाला. त्यातून ते बोलले. पण ते जे बोलले ते अर्धवट बोलले, याचा खेद वाटतो असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.


जी लढाई मी ओबीसीसाठी लढत आहेत, त्याची धार बोथट करण्याची ही खेळी असावी, अशी शंकाही वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली. मी ओबीसी समाजात जन्मलेला आणि ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. मी कधीही ओबीसी समाजाचे वाईट होऊ देणार नाही. मी ओबीसी समाजासाठी लढेन, मला मंत्रिपद महत्त्वाचे नाही. समाज खितपत पडला आहे, त्याला न्याय मिळावा, ही माझी अपेक्षा आहे आणि ती लढाई मी लढणार आहे. त्यासाठी मंत्रिपद गेले तरी मी मागेपुढे पाहणार नाही. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ठ करू नये, अशी माझी सुरूवातीपासूनची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, पण आमचे नुकसान होऊ नये, असे माझे म्हणणे आहे. पण ओबीसींच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का? हे सुद्धा समजायला पर्याय नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com