Trending

6/recent/ticker-posts

क्लस्टर संदर्भात माहिती मिळणेबाबत आझादनगरवासीयांची पंचायत !

क्लस्टर संदर्भात माहिती मिळणेबाबत आझादनगरवासीयांची पंचायत!
अन्य रहिवाश्यांचा अत्यल्प प्रतिसाद।।


आझादनगर नं १ मसाणवाडा येथील शासनामाफँत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेची माहिती मिळाणेबाबत आझादनगर वासीयांची पंचायत होत आहे। तर अन्य रहिवाशांनी माझे घर माझी जबाबदारी मोहीम  राबविण्याचा निर्णय घेतला आहे। 
गेल्या आठवड्यात आझादनगर नं १ मसाणवाडा येथे क्लस्टर योजने अंतर्गत ठाणे महापालिका आणि केंद्र सरकार यांच्या नेतृत्वाखाली टेबल सवँ चालू करण्यात आला आहे। त्यानंतर मागील ४ दिवसांत बायोमेट्रिक सव्हँ करण्यात येत आहे। मात्र सव्हँच्या दरम्यान अन्य रहिवाशांनी आडमुठी भूमिका घेतली आहे, तर अन्य रहिवाशी बायोमेट्रिक करण्यासाठी प्रतिसाद देत आहे।नाण्याच्या दोन बाजूंनी आझादनगर वासीयांची तुलना होऊ लागली आहे।


एका बाजूला मजबुरीने ग्रासलेले रहिवासी, अनेक वर्षांपासून प्रलंबित घरासाठी आयुष्य काढत बेजार तुटपुंज्या घरात जीन जगत आहेत। दर पावसाळ्यात घरांमध्ये   गटाराचे, नाल्याचे पाणी येते, छोटी घरे -दटिवाटि गल्ली बोळातील भागामध्ये सणवार साजरे करता येत नाहीत। पाहूणे मंडळी यायला नाकतोंड मोडतात। दाट वस्तीतून, चिवट गल्ली बोळातील जागेतून अनेकांना मृत्यू नंतरही मुक्तीची प्रतिक्षा करावी लागते, तिरडी साठि मोकळ्या जागेचा अभाव! अशातच लोकांचे जगणे वषाँनुवषँ   सुरू आहे। अशा परिस्थितीत सुधारणा म्हणून माझे घर माझी जबाबदारी मोहीम हाती घेऊन या योजनेला रहिवासी बायोमेट्रिक सव्हँ करण्यात पसंती देत आहेत।


तर दुसरीकडे नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे , प्रजासत्ताक जनता शी संवाद साधताना आझादनगर नं १ रहिवाश्यांनी काही प्रश्न उपस्थित केले,
१) आझादनगर नं १ मसाणवाडा येथील रहिवाशांना आपल्या स्थानिक भागातच घर मिळणार का?
२)घर आणि व्यावसायिक गाळे यासाठी कीती जागा मिळणार?
३)बायोमेट्रिक झालेल्यांना पोचपावती देणार का? 
४) दुमजली घर असेल तर वरच्या रुमची टॅक्स पावती तसेच वेगळा रुम देणार का? 
५)एका पेंक्षा जास्त टॅक्स पावती असल्यास पात्र,अपात्रतेचे निकष कसे लावण्यात येणार? 
६) घर मालक उपस्थित नसल्यास  बायोमेट्रिक कोणाच्या नावे करणार? 
७) ठाणे महापालिकेने घरांवर G/F नंबर टाकले आहेत।वरच्या रुमची हि नंबरीग केली असून त्यासाठी ही घर देणार का? प्रत्येकि टाकण्यात आलेल्या नंबरवर काय नियमावली लागू करण्यात येणार आहे? असल्या अगणित प्रश्नांची चाचणी घेऊन
रहिवासी संभ्रमात पडले आहेत। 
आझादनगर नं १ (मसाणवाडा)येथील  रहिवासीयांच्या गटबाजीला ठाणे जिल्ह्यातील पालक मंत्री एकनाथ शिंदे साहेबच अचूक न्याय देतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला।।। 


मनोजकुमार जगताप


Post a Comment

0 Comments