उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये महिलांना प्रवास करण्यास  परवानगी

उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये महिलांना प्रवास करण्यास  परवानगीमुंबई


रेल्वेने  २१ ऑक्टोबर पासून  सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७  नंतर उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये महिलांना प्रवास करण्यास  परवानगी दिली आहे. तसेच ४ सेवा (महिला विशेष) वाढविल्या जातील. पश्चिम रेल्वे आपल्या नेटवर्कवर ७०४ उपनगरी सेवा चालविणार आहे ज्यामध्ये सहा महिला विशेष आहेत. त्यामुळे रेल्वे २१.१०.२०२० पासून १४१० विशेष उपनगरी सेवा चालविणार आहे. मध्य  रेल्वे महिला विशेष ट्रेनची संख्या आणि महिलांसाठी कोचची संख्या या संदर्भात कोविडपूर्व स्थितीवर पोहोचली असल्याची माहिती रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. 


सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी नेटवर्कवर १४०६ विशेष उपनगरी सेवा चालवित आहे.  मध्य रेल्वेने १९ ऑक्टोबर पासून  २२५  उपनगरी सेवा वाढविल्या असून त्या एकूण ७०६ आहेत.  पश्चिम रेल्वेने १५.१०.२०२० रोजी १९४ सेवा वाढविल्या आहेत आणि २१ अ रोजी  स्थानकांवर येणार्‍या प्रवाशांची तपासणी: 
 १) सकाळी ११ ते दुपारी ३.०० दरम्यान आणि संध्याकाळी ७.०० नंतर:  महिलांचे कोणतेही क्यूआर कोड / ओळखपत्र  चेकिंग होणार नाही आणि फक्त तिकिटेच तपासली जातील, कारण या वेळेत सर्व महिलांना प्रवासाची परवानगी आहे.  वैध तिकिटांव्यतिरिक्त इतरांची क्यूआर कोड / ओळखपत्रांची तपासणी केली जाईल
 २) इतर वेळी: प्रत्येकास क्यूआर कोड / ओळखपत्र व वैध तिकिटांनुसार तपासणी करावी लागेल.


 राज्य सरकारने निश्चित केलेल्या  अत्यावश्यक श्रेणीतील कर्मचारी  व महिलांनी (सकाळी ११ ते दुपारी  ३.०० दरम्यान आणि सायंकाळी ७.०० नंतर) वगळता इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये अशी विनंती केली जाते.  प्रवाशांनी कोविड-19 संबंधित  असलेल्या आदेशानुसार वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे अनुसरण करावे अशी विनंतीही रेल्वेने केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या