एंटी रॅगिंग कमिटीच्या रिपोर्टनुसार आरोपींना तात्काळ सस्पेंड करण्याची मागणी
मुंबई
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अँटी रॅगिंग कमिटी जो रिपोर्ट दिला आहे त्यानुसार तीन आरोपींना सस्पेंड करायला हवे होते. पण नायर हॉस्पिटल, राज्य सरकार यांनी कोणतीही कारवाई केली नाही, कारवाई न करणं ही न्यायाची कुचेष्टा आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. एंटी रॅगिंग कमिटीच्या रिपोर्टनुसार तीन आरोपींना तात्काळ सस्पेंड करण्याची मागणी करीता वंचितच्या वतीने नायर रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच यासाठी नायरच्या अधिष्ठातांची हकालपट्टी व्हावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तीन आरोपी पुन्हा आतमध्ये आल्यानंतर चौकशी वर प्रभाव पाडू शकतात असे मत वचिंत बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्ष रेखा ठाकूर व्यक्त केले. या सगळ्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडी हस्तक्षेप करणार असून यासंदर्भात वंचितचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
पायलच्या मृत्यू नंतर या तीनही आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला व चौकशीमध्ये पोलिसांना सहकार्य न करता त्या फरार झाल्या होत्या. कायदा व न्याय व्यवस्थेला धुडकावून लावण्याच्या आरोपींच्या या कृतीमुळे नायर वैद्यकीय महाविद्यालयाने त्यांना महाविद्यालयीन परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. आज हे आरोपी मायग्रेशनसाठी न्यायालयाला विनंती करीत आहेत. परंतू त्यांनी जे समाज विघातक गुन्हेगारी कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे व त्यानंतर त्यांचे कायद्याला न जुमानण्याची निर्ढावलेली भूमिका पाहता त्या कोणत्याही सवलतीस पात्र नाहीत. हीच भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली होती .
0 Comments