Top Post Ad

टीका करताना आपली लायकी पाहून करावी 

 चिल्लर गल्लीतील शेंबड्या पोरांनी टीका करावी एवढी लायकी एवढी पत आहे का? 


आंबेडकरी समाजावर टीका करताना ह्याचे  भान ठेवा ज्यांना आता तुम्ही महापुरुष म्हणून स्वीकारू लागलाय त्यांना जिवंत ठेवण्याचे काम याच आंबेडकरी जनतेने केलेय. हिन्दू म्हणून असलेल्या एकाही मंदिरात शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचे फोटो सापडणार नाही पण प्रत्येक बुद्ध विहारात नुसते फोटोच नाहीत तर त्याच्या आयुष्यावरील पुस्तकांचा देखील साठा असतो. हा आहे वैचारिक फरक.
एका महापुरुषाच्या वंशजाने दुसऱ्या महापुरुषाच्या एका वंशजावर टीका केली ते दोघे पाहून घेतील ना,,,,  चिल्लर गल्लीतील शेंबड्या पोरांनी टीका करावी एवढी लायकी एवढी पत आहे का?  जे वक्तव्य केले ते एका महापुरुषाचे नातू आहेत ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात त्यांचा नातू आहे आणि त्याच्यावर टीका करताना एक लक्षात घ्या कि याच महापुरुषामुळे तुम्ही ज्यांना आता स्वीकारले आहे ना ते  महापुरुष आम्हीच जिवंत ठेवलेत आजवर नाही तर कधीच  ते काळाच्या ओघात लपवले असते २२०० वर्षे जुन्या सम्राट अशोक यांना जसे काळाच्या ओघात लुप्त करण्याचा प्रयत्न केला तसेच झाले असते सम्राट अशोकाने कोरीव लेख लिहले म्हणून आज जगासमोर आले आपल्याकडे तेवढे हि ऐतिसिक दाखले नाहीत. 


बौद्ध समाजाचे दुर्दैव आहे हि सतराशे साठ लोकांच्या नादि लागलाय. केवळ समाजच नाही तर ज्याला तालुक्यात कोण विचारात नाही असे चिल्लर व कालची कार्टी एकेरी नावाने  चिडवू लागलेत. ज्यांना विहारात जागा विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब यांच्यामुळे आहे त्यांनी सांगितले नसते तर कदाचित हे महापुरुष काळाच्या ओघात गायब झाले असते. अवघ्या १०० वर्षात जिथे शिवरायांची समाधी विस्मरणात जाते... त्याचा शोध घेण्याची तसदीही कोणी करत नाही,  अश्या लोकांनी इतिहासाचे दाखले आम्हाला न दिलेले चांगले आहेत.  राहिली गोष्ट कि शाहू महाराजांनी बाबासाहेब यांना मदत केली तर एकदा शाहू महाराज आणि बाबासाहेब  यांच्यामधील सबंध तपासून पहा आणि मदत कशी होती आणि  कश्या प्रकारे तिची परतफेड केलीय हे हि अभ्यासून घ्यावे शाहू महाराज यांच्या प्रत्येक कामाला पूर्णत्वास नेवून बाबासाहेबांनी शाहू महाराजांनी केलेल्या मदतीची परतफेड केलीच पण समाजाला संदेश दिला कि एकवेळ माझा जन्मदिवस साजरा नाही केला तरी चालेल पण राजर्षी शाहू राजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा. 


जयंती तर सोडा साधे नाव घेत नाही त्या दिवशी आंबेडकरी जनता विहारात शाहू राजांचा जन्मोत्सव साजरा करत असतो केवळ बाबासाहेबांच्या एका आदेशावर, शिवाजी महाराजांच्या बाबतीत जास्त बोलत नाही कारण कोणत्या हि वादात जाण्यात काही अर्थ नसतो स्वतःला शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवून घेणाऱ्या लोकांना त्यांच्या बाजूच्या किल्ल्याची माहिती नसते अश्यानी आमच्याशी तरी याविषयावर न बोललेले चांगले आहे अक्ख आयुष्य गेलय यात आम्ही आमचा इतिहास काढायला गेलो तर मात्र अनेक गोष्टी बाहेर येतील. म्हणून टीका करताना समोरच्या माणसाच्या मागे आंबेडकर हे नाव आहे हे विसरू नये  आणि याच नावापाठी करोडो चा समाज उभा आहे हे हि विसरू नये तुमच्या स्वार्थासाठी केवळ आंबेडकरी जनतेला शिव्या देणे बंद करा तुमचे मारेकरी तुमचेच लोक आहेत आंबेडकरी जनतेने उलट वेळोवेळी सहकार्य च केल आहे पण जेव्हा पासून कोपर्डी ची घटना घडल्यापासून पुरोगामी आणि प्रतिगामी दोन्ही लोकांनी आंबेडकरी जनतेवर च  हल्ले करायचे ठरवले तेव्हा पासून आज पर्यंत शत्रू कोणी दुसरा आहे पण लढाई लढायची ती आंबेडकरी जनतेशी  ह्याच उद्देशाने आजवर चे काम चालू आहे. 



एक दिवस कळेल तुमचे शत्रू तुमचेच लोक आहेत आणि हे आताचे नाही, शिवाजी महाराजांच्या काळातही तेच होते. आजही तेच आहेत. ज्यांच्या बापजाद्यानी स्वराज्य निर्मितीमध्ये विरोध केला, त्यांचे वंशज आता शिव्या देवू लागलेत. ज्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची पायाभरणी केली त्या आमच्या पूर्वजांच्या इतिहासाला नीटशी ओळख झालेली नाही आपली अजून. शिवारायांच्या सोबत उभा असलेला आमचा पूर्वज जो एका तलवारीच्या घावात  वाघाचे शीर धडावेगळे करत होता, ज्यांनी स्वराज्याच्यासाठी जीवाची पर्वा केली नाही. संभाजी राजांना पकडून मुक्रब खान नेत असताना जे त्यांच्यावर थुंकत होते त्यांच्याच औलादी आज विरोधात बोलत आहेत. पण हजारो सैन्याच्यामध्ये जावून आपला छत्रपती मुक्त व्हावा म्हणून हजारो नंग्या तलवारीची पर्वा न करता संभाजी राजांना सोडवण्याची धडपड करणाऱ्या स्वराज्याच्या मावळ्याचे वंशज हि आम्हीच  आहोत. पण आम्ही तोही इतिहास सोडून देतोय कारण त्याच्याही पलीकडे खूप मोठा इतिहास आहे. बाहेरून आलेल्या लोकांनी इथे सरदारक्या मिळवून इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी लाटल्या आणि अधिकार गाजवू लागले म्हणजे ते इथले भूमिपुत्र होत नाही. शेवटी महाराष्ट्राच्या मातीत भूमिपुत्र म्हणून जी नावे पाषाणावर कोरलेली आहेत तीही  हजारो वर्षे जुनी कुणाची आहेत ते लक्षात घ्या. त्यामुळे  विरोध करताना भान असू द्या.


आज ७० वर्षाने आरक्षणाची गरज भासते आहे   नियत चांगली असली हेतू चांगला असला कि सर्व गोष्टी चांगल्या होतात पण हेतू आणि नियतीत खोट असेल तर मात्र  काहीच हाती लागत नाही हेतू स्वच्छ ठेवा. टीका करताना भान राहू द्या बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत त्यांनी उदयनजी भोसले यांच्यावर टीका तर त्याचे उत्तर उदयन भोसलेजी देतील. कुणी ऐऱ्यागैऱ्याने यामध्ये पडून त्याचे उत्तर देण्याच्या लायक आहे का.  त्यामुळे अपेक्षा आहे सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आपल्यातील अशिक्षित लोकांना आवर घालणे.  म्हणजे जे मागताय ते तरी प्रामाणिक लोकांना मिळेल. नाहीतर या दलालांच्या बाजारात प्रामाणिक लोकांचा बळी हमखास जातो. 


आजही शिक्षण संस्था तुमच्याच मालकीच्या असूनही तुम्हाला जागा नाही भेटत.  सहकार संस्था तुमच्याच असून तुम्हाला हमीभाव नाही भेटत. उद्योग संस्थाही तुमच्याच असून तुम्हाला नोकऱ्या नाही भेटत. राजकीय सत्तेत तुमचेच लोक असून तुम्हाला न्याय नाही भेटत. एवढे पुरेसे नाही का शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजण्यासाठी. असो जसे तुम्हाला छत्रपतींचे वंशज प्रिय आहेत तसे आम्हाला हि बाबासाहेब यांचे वंशज प्रिय आहेत. चळवळीचे धडे ज्यांच्याकडून शिकलात त्यांनाच विरोध करायला गेल्यावर शेवटी मिळणार काय हे नवीन सांगायची गरज  नाही. तेव्हा मागणी प्रामाणिक असावी स्वच्छ हेतूने असावी.


 



 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांनी एक राजा बिनडोक आहे. तर दुसऱ्या राजाची मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट नाही अशी खोचक टीका केली होती. या विधानामुळे संपूर्ण राज्यभरात याचे तीव्र पडसाद पहायला मिळाले. राज्यभरातुन मराठा समाजाने प्रकाश आंबेडकरांविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया देत व निषेध करत असतांनाच प्रकाश आंबेडकर काहीही चुकीचे बोलले नसल्याची प्रतिक्रिया खा. संभाजी राजे भोसले यांनी दिली आहे.  खासदार संभाजी राजेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहु महाराज यांचे चांगले संबंध होते. प्रकाश आंबेडकर हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असून ते जे काही माझ्याबद्दल बोलले ते चुकीच बोलले नाहीत असा खुलासा खासदार संभाजी राजे यांनी केला आहे. माझ्याबद्दल ते काहीही उलट सुलट बोलले नसून आमच्या बंधूंवर त्यांनी केलेले वक्तव्य हे अशोभनीय आहे. मला मनापासून ते आवडलेलं नाही. यापूढे त्यांनी असे बोलू नये.शेवटी देशात लोकशाही आहे. सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे.असेही ते मुलाखती दरम्यान म्हणाले.


 


 लक्ष ठेवा, सावध राहा
प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे भोसले यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध राज्यभर तक्रारी करण्यात येत आहेत. नाशिकमध्ये गुन्हा दाखल केल्याचे वाचण्यात आले. सुज्ञ असाल तर नीट लक्ष ठेवा, तक्रारकर्ते हे बहुतेक RSSचे हस्तक असण्याची शंका आहे. अगदी तक्रार सुद्धा तेच ड्राफ्ट करतील, तुमच्या सह्या घेतील. हा वाद आंबेडकर-भोसले असा न राहता मराठा-दलित असा व्हायला एक दिवस पुरे आहे आणि तो सोशल मीडियावर उफाळून येईल. आपण चाली ओळखून चालावे. दोन्ही घराण्याचा आदर आपल्या मनात कायम असुद्या, फक्त राजकारण करणाऱ्या वारसांच्या भानगडीत पडू नका. ते समाजासाठी नाही तर कोणासाठी काम करत आहेत, हे समजून घ्या....🙏🏻


 


प्रतिक्रिया......







मागे वळून पाहाताना...!



मराठा आरक्षणाची मागणी तशी 1989 पासून सुरू झाली. मंडल आयोगाच्या अंमलबजावणी नंतर मराठा बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या. पण या मागणीने ख-या अर्थाने जोर धरला तो कोपर्डी येथील मुलीवर करण्यात आलेल्या बलात्कार आणि खूनाच्या अमानूष घटनेनंतर. या प्रासंगिक घटनेच्या विरोधात सकल मराठा समाज एकवटला आणि महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात त्यांनी लाखोंचे मोर्चे काढले. त्यांच्या मागण्या होत्या-

1) कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी व्हावी.  2)शिक्षण आणि नोक-यांमधील आरक्षण मराठ्यांना मिळावं.  3)अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा अथवा शिथिल करावा. 

 

मराठा मोर्चानंतर विविध समाजगटांनीही मोर्चे काढले. ज्यात मराठ्यांच्या काही मागण्यांना समर्थन दिले तर काही मागण्यांना विरोध करण्यात आला.   ओबीसींनी मोर्चे काढले त्यामध्ये विविध मागण्यांसह मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण न देता त्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी. या मोर्चात कुणबी समाजसुद्धा सहभागी होता.



बौद्ध व इतर अनुसूचित जातीच्या समाजानेही विविध मागण्यांसह अनेक मोर्चे काढले. त्यामध्ये अॅट्रोसिटी कायदा अधिक कडक करण्याची प्रमुख मागणी होती. मुस्लिमांनीही आरक्षण मिळावे यासाठी मोर्चे काढले.

 



बौद्धांच्या मोर्चाचं घोषवाक्य होतं-

'तूम भी देखो अपनी आंखों से  हम भी आये लाखों से !'



या पार्श्वभूमीवर 'एक मराठा लाख मराठा'च्या झंझावातात प्रतिमोर्चे काढू नका असं बेंबीच्या देठापासून अॅट्रोसिटीच्या कवच-कुंडलधारकांना आवाहन करणारा एकच नेता होता- आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर !

पण समाजाच्या भावना एवढ्या तीव्र होत्या की, मोर्चे काढून त्यांनी शांततापूर्वक असंतोषाला वाट मोकळी करून दिली. समाजाची ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती एवढेच. पण एका वाक्यानेही मोर्चेक-यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, हे मराठा बांधवांनी लक्षात घ्यायला हवे.

परभणीत लाखोंचा मोर्चा यशस्वी आणि शांततेत पार पडल्यानंतर पूज्य भदंत डाॅ. उपगुप्त स्थवीर, पूज्य भदंत मुदितानंद थेरो आणि भिक्खू संघासोबत अबाल वृद्धांपासून सर्व वयोगटातील नागरिक आणि महिलांनी हजारोंच्या संख्येने दर्शविलेली उपस्थिती ऐतिहासिकच होती ! पुढे अॅट्रोसिटीचा कायदा शिथिल तर झालाच नाही; उलट तो आणखी कडक करण्यात आला !



मराठा आरक्षण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा बांधवांना दिलेला सशर्थ पाठिंबा पुरेसा बोलका नि सर्वहितैषी होय.



भवतु सब्बं मंगलम् !



जय भीम !  जय संविधान !!   जय भारत !!!



@ भीमप्रकाश गायकवाड,

'मूकनायक'  रविराजपार्क, परभणी






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com