Top Post Ad

क्लस्टर योजनेच्या हरकतीवर होणारी सुनावणी रद्द करण्याची ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीची मागणी

क्लस्टर योजनेच्या हरकतीवर होणारी सुनावणी रद्द करण्याची ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीची मागणी

ठाणे
नागरी पुनर्निर्माण समूह विकास योजना (क्लस्टर योजनेच्या) विशेष नियमावली  अंतर्गत नागरी पुनर्निर्माण आराखडा (URP) बाबत सूचना/ हरकतीवर होणारी कोळीवाडा, गावठाण, पाडे येथील भूमीपुत्रांची व सर्व ठाणेकरांची सुनावणी रद्द व्हावी.  गावठाण, कोळीवाडे ,पाडे जर क्लस्टर योजनेतून वगळण्यात आले आहेत तर तेथे वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्र व स्थानिक राहिवाश्यांच्या सुनावण्या रद्द करून गावठाण, कोळीवाडे, पाडे क्लस्टर योजनेतून वगळल्याचा लेखी शासन निर्णय आदेश (GR) काढावा याकरिता ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. 

 क्लस्टर योजने विरुद्ध मोठ्या प्रमाणात जनजागृती करून सर्व भूमीपुत्रांनी संघटितपणे प्रकर्षाने लढा दिला व सर्व राजकीय पक्षांचे व नेत्यांचे आमच्या हरकती व मागण्यांकडे लक्ष वेधण्यास काही अंशी यश मिळाले.  याबाबत जनआंदोलनाची दखल घेत विधान परिषद व विधान सभा या दोन्ही सभागृहात आमदार लोकप्रतिनिधींनी वरील विषयाची दखल घेत सभागृहात भूमीपुत्रांची भूमिका योग्य रीतीने मांडली तसेच  त्यापूर्वी असलेले  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावठाण, कोळीवाडे ,पाडे क्लस्टर योजनेतून वगळण्यात येतील असे केवळ तोंडी आश्वासन देऊन गावठाण कोळीवाडे,पाडे येथील स्थानिक भूमिपुत्र व रहिवाशांची बोळवण केली. आणि वेळ मारून नेली. आजपर्यंत त्यांनी दिलेल्या या तोंडी आश्वासनाचे लेखी शासन निर्णय आदेशात (GR) मध्ये रूपांतर आज पर्यंत झाले नाही

तसेच विधान सभा व विधान परिषद सभागृहात जो पर्यंत गावठाण कोळीवाडे यांचे विस्तारित सिंमांकान होत नाही तोवर SRA योजना,क्लस्टर योजना तशाच विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कोणत्याही योजना राबवता येऊ नये व येणार देखील नाही त्याबाबत सखोल चर्चा होऊन आश्वासन देखील देण्यात आले. तरीही क्लस्टर योजना जोर जबरदस्तीने रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे.  आज देखील क्लस्टर योजनेची टांगती तलवार सर्व कोळीवाडा गावठाण पाडे येथील भूमिपुत्रांच्या डोक्यावर आहे म्हणूनच आज देखील सुनावणींना हजर राहण्याचे पत्र कोळीवाडा, गावठाण,पाडे मधील भूमिपुत्रांना ठाणे महापालिका पाठवत आहे तरी आपण गावठाण, कोळीवाडे, पाडे क्लस्टर योजनेतून वगळले असा लेखी शासन निर्णय आदेश (GR) लवकरात लवकर काढावा अशी विनंती करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव प्र. क्र. ५८६ मध्ये गावठाण कोळीवाडे वगळण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे असे  स्पष्ट नमूद आहे.  तरीही ठाणे महापालिकेतील संबधित अधिकारी गावठाण, कोळीवाडा येथील स्थानिक भूमिपुत्रांना क्लस्टर योजनेबाबत सुनावणीसाठी का बोलविण्यात येत आहे. त्याचा जाब आपण संबधित अधिकाऱ्यांना व ठाणे महापालिकेला नक्कीच विचारावा व त्या अधिकाऱ्यांच्या वर योग्य कारवाई  व त्याची चौकशी नक्कीच करण्यात यावी. स्थानिक  भूमिपुत्रांना जाणीवपूर्वक संभ्रमात ठेऊन जबरदस्तीने योजना रेटण्याचा डाव संबधित अधिकाऱ्यांचा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून  संबंधितांवर कठोर कारवाई करावी करण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे.

यापूर्वी ही गावठाण कोळीवाडा येथील भूमीपुत्रांनी सहसंचालक, नगर रचना,कोकण विभाग,कोकण भवन,सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई येथे आपल्या हरकती सूचना लेखी दिल्या व त्या संबंधीच्या सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहून आपले स्पष्ट मत सहसंचालकांसमोर मांडण्यात आले असतानाही पुन्हा पुन्हा सुनावण्यांना भूमिपुत्रांना सामोरे जावे लागते आहे. या प्रकरणात आपण जातीने लक्ष घालावे व भूमिपुत्रांना या क्लस्टर योजनेतून कायमचे वगळून त्यांचा शाश्वत स्वयं विकासासाठीचा मार्ग प्रशस्थ करावा.  गावठाण,कोळीवाडा मधील भूमिपुत्रांना ही सुनावणी होणे व  घेणे मान्यच नाही त्यामुळे ही सुनावणी रद्द करण्याची  मागणी ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीच्या वतीन करण्यात आली आहे. 

             Covid 19 ची आपत कालीन परिस्थिती संपूर्ण देशात असताना आणि ठाणे शहर पण त्याला अपवाद नसतांना आणि जनतेच्या आरोग्याचा संरक्षणाचा, सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असतांना देशात अनेक ठिकाणी तसेच ठाण्यात साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५  हे कायदे व  कडक निर्बंध असतांना ठाणे महापालिकेला या क्लस्टर योजने संबंधीच्या सुनावण्या घेण्याची का घाई लागली आहे ?  ही योजना प्रशासनातील  काही अधिकारी वर्ग आपल्या हितसंबंधियांच्या सांगण्यावरून वैयक्तिक व कोणाच्यातरी स्वार्थासाठी  जबरदस्तीने जनतेच्या माथी रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.  Covid 19 च्या आपत्कालीन परिस्थितीत इतर अनेक समस्येना ठाणेकर जनता समोर जात आहे व ठाणेकर जनतेचे मानसिक स्वास्थ  स्थिर नसतांना ठाणेकर जनतेला त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचे प्रश्न व आर्थिक अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले असताना ठाणेकर जनतेला सुनावणीसाठी बोलवले जात आहे. तरी आपण तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून ही सुनावणी रद्द करण्याचे आदेश ठाणे महापालिकेला व संबधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 


 


जाहिरात ------------------------------------------------------------------------
|  मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र    
|  जमिन खरेदी, विक्री, कुळ कायदा, भू-संपादन, वारसाहक्क,            
|  जमिनीचे वाटप, बिनशेती, इनाम, वतन, नवीन शर्त जमिन,          
|  दाखले, परवाने, सरकारी गृहनिर्माण सोसायटी योजना                    
|  इत्यादींबाबत मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन                       
 दररोज दुपारी 3 ते 5 (रविवारी बंद)                                             
 " प्रजासत्ताक जनता" कार्यालय, 51, दादोजी कोंडदेव स्टेडियम,    
|  नागसेन नगर, सिडको रोड, ठाणे (पश्चिम), ४०० ६०१.                    
|-------------------------------------------------------------------------------


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com