नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य द्या- डॉ. संग्राम पाटील

कोरोना आजाराकडे संधी म्हणून बघू या,

नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य द्या- डॉ. संग्राम पाटील 

 

ठाणे
मानवी जीवन मौल्यवान असून प्रत्येकाने विवेकशीलता जपली पाहिजे. आपल्या देशात प्रश्न विचारायची सवय आणि संशोधक वृत्ती वाढवली पाहिजे. कोरोना आजाराकडे संधी म्हणून बघू या, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य दिल्यास कोरोनाशी यशस्वी मुकाबला करणं शक्य आहे", असे मत मूळचे महाराष्ट्रीयन आणि सध्या इंग्लंड येथील वैद्यकीय  सेवेत कार्यरत असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर संग्राम पाटील यांनी व्यक्त केले.  येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात "कोरोना कडून आपण काय शिकावे ? " या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते.

 

  डॉ. संग्राम पाटील पुढे म्हणाले, "राजकीय सजगतेचा आभाव आपल्या देशात दिसतो. देशात या आजाराची गंभीर परिस्थिती असताना धार्मिक कार्यक्रम घडवले जातात. कष्टर्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या पेक्षा एका अभिनेत्याची आत्महत्या हा मुद्दा जास्त महत्वाचा  ठरतो. माध्यमे या बाबतीत गांभीर्य जपत  नाहीत. धर्म प्रांत यांच्या अस्मितेपेक्षा माणुसकी महत्वाची ठरली पाहिजे. जगभरात सध्या एकाच प्रश्नाला भिडले जाते ते म्हणजे कोरोणावर मात करणे. लोकांचे प्रश्न, लोकांचे प्राण वाचवणे, लशी शोधण्याच्या प्रक्रियेला गती देणे. आपल्याकडं संशोधन वृत्तीला महत्त्व दिले जात नाही. शासकीय यंत्रणा माध्यमे यांच्या गैर व्यवस्थापनाने कोरोणाची भीती वाढली. योग्य काळजी घेतल्यास या आजारातून आपण नक्कीच बरे होऊ शकतो.

 

आधुनिक जग हे पुराव्यावर विश्वास ठेवते. आपल्या देशात वैज्ञानिक दृष्टीकोन याला डावलून  फसवे विज्ञानाची चलती ही चिंताजनक आहे. निसर्गाने मानवाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याचा सुयोग्य वापर करावा."

 या वेळी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, "महा. अं नि स च्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी या कोरोना काळात खूप मोलाचे कार्य केले आहे. मुख्यमंत्री निधीला मदत, रक्तदान, अन्न दान करण्याचे, मानस मैत्र माध्यमातून मानसिक आधार देण्याचे काम केले आहे. या दरम्यान विविध अंधश्रद्धा पुढे आल्या त्यालाही विरोध केला, लोकांचे प्रबोधन केले. डॉक्टर संग्राम पाटील हे जागतिक स्तरावरचे कोरोणा योद्धा आहेत. या कार्यक्रमात उत्तम जोगदंड यांनी स्वागत केले. नितीन राऊत, सुधीर निंबाळकर, श्रेयस भारुले, प्रा. प्रमोद गंगणमाले यांनी संयोजन केले. या कार्यक्रमाला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला 

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या