शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - ऍड. प्रकाश आंबेडकर
पुणे
कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनाच्या काळात शाळा महाविद्यालये सुरू करणे शक्य नाही हे आम्ही समजू शकतो. मात्र त्याला कुठेना कुठे सुरुवात करावी लागेल. त्यासाठी नियमावली तयार करून राज्यातील सर्व खाजगी क्लासेस सुरू करावेत. एकदा का हे क्लासेस सुरू झाले की शाळा महाविद्यालये सुरू करण्यास वेळ लागणार नाही, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यातील सर्व खाजगी क्लासेस नियमावली लावून सुरू केले की, त्याचा फायदा असा होईल की विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ते कमी होण्यास मदत होईल. एकदा भीती गेली की सर्वच गोष्टी सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
कोरोनामुळे राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सर्व ठिकाणी ऑनलाइन अभ्यासक्रम घेणे शक्य नाही. त्यामुळे शाळा-महाविद्यालये चालू करण्याबाबत शासनाने विचार करावा. त्यापूर्वी खाजगी क्लासेस चालू करण्यासाठी नियमावली तयार करण्यात यावी. शंभर विद्यार्थ्यां ऐवजी ४० विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी. एकदा का राज्यातील सर्व खासगी क्लासेस सुरळीत चालू झाले की शाळा महाविद्यालये हा शेवटचा टप्पा असून ते सहजपणे सुरू करता येतील. त्यासाठी राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली असल्याची माहिती पक्षाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
दरम्यान दादर इंदू मिल या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून त्याची पायाभरणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होती. मात्र या कार्यक्रमाला बाबासाहेबांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर तसेच इतर नेत्यांना बोलवण्यात आले नसल्याने हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र आपल्याला आता आमंत्रण आले तरी या पायाभरणी कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे. त्यामुळे राज्यात या पैशाचा उपयोग कोरोना सेंटर उभारण्यात करावा, असे स्पष्ट मत ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.
जाहिरात ------------------------------------------------------------------------
| मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र |
| जमिन खरेदी, विक्री, कुळ कायदा, भू-संपादन, वारसाहक्क, |
| जमिनीचे वाटप, बिनशेती, इनाम, वतन, नवीन शर्त जमिन, |
| दाखले, परवाने, सरकारी गृहनिर्माण सोसायटी योजना |
| इत्यादींबाबत मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन |
| दररोज दुपारी ३ ते ५ (रविवारी बंद) |
| गाळा क्र.५१, दादोजी कोंडदेव स्टेडियम, नागसेन नगर, |
| सिडको रोड, ठाणे (पश्चिम), ४०० ६०१. |
|-------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या