Top Post Ad

उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

यूपीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून जातीय अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात.:- पँथर डॉ राजन माकणीकर


मुंबई
भारतात आरएसएस प्रणित भाजप सरकार सत्तेत आल्यापासून विषमता डोकं वर काढत आहे, उत्तर प्रदेश मध्ये जातीय हिंसाचारात वाढ होऊन रामराज्य मॉडेल सपशेल फेल ठरले आहे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चे सरकार जातीय कारवाया रोखण्यात असमर्थ ठरले असल्यामुळे यूपीत राष्ट्रपती राजवट लागू करावी असे निवेदन भारताचे रात्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांना आरपीआय डेमोक्रॅटिक व पँथर ऑफ सम्यक योद्धा च्या वतीने राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी इमेल द्वारे केले आहे.
            उत्तर प्रदेश येथे दलित मुस्लिम विरोधी अत्याचार वाढले असून जातीय अराजकता निर्माण झाली आहे, महिला असुरक्षित असून मुलींवर सामूहिक बलात्काराच्या घटनेट कमालीची वाढ झाली आहे, ही फार शरमेची बाब आहे.
सरकार मध्ये गाय आणि सवर्णांना संरक्षण मिळत असून संविधानाची पायमल्ली होत आहे, जातीचे राजकारण केले जात आहे, आंदोलन करणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्यात येऊन गरीबांचा आवाज दाबला जात आहे.
मनुवादी विषमतावादी शक्ती आपले विष पसरवत आहेत.


        आशिफा झाली आता हाथरस येथे मनीषा वाल्मिकी सारख्या दिन व दुबळ्या जातींतील तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिने पोलिसात आवाज उठवू नये म्हणून दाताने तीचि जीभ कापून टाकली जात आहे, तरीही मनीषा ने पोलिसात तक्रार केली मात्र पोलीस यंत्रणा कडून तपास ही पक्षपाती होऊन योग्य उपचाराअभावी तिचे मयत झाले भारतीय लोकशाहीला कालिंबा फासणारी ही बाब आहे, तरीही भारतातील मीडिया लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानली जाणारी गोदी, दलाल मीडिया या प्रकरणाकडे कानाडोळा करत असून या घटनेचा रिपाई डेमोक्रॅटिक व पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन बलात्कार व जातीय अत्याचारात बळी पडलेल्या मनीषा वाल्मिकी या बहिणीस आदरांजली अर्पण करून राष्ट्रपती महोदयांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात असे निवेदनात डॉ माकणीकर यांनी म्हटले आहे. 


        उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू कारावी.  दलित मुस्लिम अत्याचाराच्या प्रश्नावर देशातील सर्व सरकारने कठोर भूमिका घ्यावी. मनीषा वाल्मिकी सह सर्वच जातीय अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे चालवावेत.
सर्व जातीच्या महिलांना योग्य संरक्षण मिळावे असे शासन व पोलीस यंत्रणा मजबूत करावी.  मनीषा वाल्मिकीच्या वासनांध मनुवादी नराधमांना भर चौकात फाशी द्यावी. अश्या स्वरूपाच्या मागण्या डेमोक्रॅटिक आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पँथर ऑफ सम्यक योद्धाचे संस्थापक महासचिव डॉ राजन माकनीकर यांनी केल्या आहेत.  ईमेल केलेल्या निवेदनावर सम्यक पँथर व आरपीआय पक्षाच्या प्रमुखासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष पँथर श्रावण गायकवाड, शिवाभाई राठोड यांची नावे आहेत.
       जातीय हिंसाचार व अत्याचार प्रकरण जर थांबले नाहीत तर पुज्य भदंत शिलबोधी व युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात देशभरात "योगी हटाव युपी बचाव" असा हॅशटॅग वापरून स्वाक्षरी अभियान चालू करणार असून मा राष्ट्रपती यांची वेळ निश्चित करून प्रत्यक्ष लाखो स्वाक्षरीनिशी पूज्य भदंत शिलबोधी व कनिष्क कांबळे यांचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती डॉ माकणीकर यांनी  दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1