Top Post Ad

नेहमीच्या वीज खोळंबामुळे टिटवाळातील नागरिक हैराण

वीजेचा खोळंबा,टिटवाळात संतापजनक वातावरण


टिटवाळा
उद्या दिनांक 25/९/२० रोजी मेंटेनन्स कामाकरीता महापरेशन तर्फे मोहने उपकेंद्र येथील महत्त्वाच्या बसबार बदली करण्याच्या कामाकरीता  विद्युत पुरवठा सकाळी १० ते संध्यकाळी ८ या वेळेत बंद करण्यात येणार आहे  याची कृपया नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे ही विनंती.सहाय्यक अभियंता महावितरण मांडा टिटवाळा असा SMS  What's up वर पाठवून महावितरण नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न तर करतात मात्र काम अगदी ढिम्म गतीने सुरू असते वेळ १० ची सांगतात लाईट येते ११/३०वाजता! नागरिकांना गृहित धरण्याचा प्रकार आहे। चक्क १२ तास बिना लाईट टिटवाळाकर हैरान.

तांत्रिक बिघाड आहे वेळ लागतो हे आम्ही समजू शकतो! परंतू दर हप्पत्याला काहीतरी तांत्रिक कामे नियोजनबद्ध व्हावे हीच आमची अपेक्षा आहे। मोहने फिडर मध्ये बिघाड, तर कधी गणेश वाडी वलाराम वाटिकेतील डि पी ची तांत्रिक बिघाड,पावसाआधी व नंतर झाडे तोडणे, वारंवार डि ओ जाण्याची समस्या त्यातच आँफिशिअल फोन व्यस्त, अधिकार्‍यांना वेळेवर भेटता येत नाही। बिलाची समस्या, वाढिव वीज बिल!एरवी लोड शेडिंग चा फटका! असल्या तक्रारीमुळे टिटवाळ्यातील नागरिकांमध्ये संतापजनक वातावरण आहे। ऐनवेळी लाईट नसल्याने अनेक कामांचा खोळंबा होतो,


अनेकांची कामे विजेवर अवलंबून असतात आणि सध्या कोरोनाभय वातावरणामूळे अनेकांना work from home ची कामे दिलेली आहेत, लाईट नसल्याने पाण्याची समस्या भेडसावत असते कारण टिटवाळात बहुतेक ठिकाणी बोअरवेल आहेत। तांत्रिक बिघाड, दुरूस्ती त्यासाठी आवश्यक ती लोडशेडिंग! असली कामे सुरूच राहणार आहेत मात्र या कामांसाठी तत्काळ नियोजन करण्यात यावे परिस्थितीचा आढावा घेवून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे। तरच कटिबद्ध कामे मार्गी लागतील। आणि या कामांव्यतिरिक्त मांडा टिटवाळ्यातील परिसरात दर-दिवस लाईट जाण्याचे प्रमाण कमी करावे असे या माध्यमातून निवेदन वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता मांडा टिटवाळा यांना देण्यात येत आहे असे टिटवाळाकरांनी सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com