Top Post Ad

वाघिवळीवाडा ऐतिहासिक लेणीच्या पुनर्वसनासाठी सिडकोला टाळे ठोकणार

वाघिवळीवाडा ऐतिहासिक लेणीच्या पुनर्वसनासाठी सिडकोला टाळे ठोकणार


नवी मुंबई
 वाघिवलीवाडा ऐतिहासिक बौद्ध लेणीच्या संवर्धनात मागील काही महिन्यांपासून आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने आंदोलन निवेदन व तक्रारी असे उपक्रम चालू असताना सिडको प्रशासनाने आंदोलनकाऱ्यांना विश्वासात ना घेता लेणी भुईसपाट करून अवशेष गायब केल्याने बौद्ध आंबेडकरी निसर्गप्रेमी व लेणी अभ्यासक संघटना संस्था उग्र झाल्या आहेत.
किंबहुना सद्यस्तिथीला विमानतळाच्या बाजूला वाघिवळीवाडा लेणीची प्रतिकृती म्हणजेच पुनर्वसन करण्यात यावे व लेणी नष्ट करणाऱ्या अधिकारी व गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षातर्फे  सिडकोला टाळ ठोकणार असल्याचे निवेदन संबंधितांना देण्यात आले आहे. 


तसेच सिडकोला कुलूप लावणार असलेले आंदोलन पुज्य भदंत शिलबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाध्यक्ष महिंद्रा जाधव यांच्या नेतृत्वात राज्य महासचिव श्रावण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर बंजारा सेल राज्य प्रमुख शिवाभाई राठोड  यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यां समवेत 12 ऑक्टोम्बर दुपारी 2 वाजता सिडको कार्यालयासमोर होणार आहे. राष्ट्राची संपत्ती आहे ती नष्ट करण्यात आली आहे तिचे पुनर्वसन होऊन जपवणूक करण्यात यावी आणि यासाठी आरपीआय डेमोक्रॅटिक स्वबळावर सिडको प्रशासनाच्या मुसक्या आवळून लेणी चे पुनर्वसन करऊन घेईल असा आशावाद राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी व्यक्त केला. तर आंबेडकरवादी, बौद्ध, लेणी, निसर्ग आणि इतिहासप्रेमींनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय महासचिव डॉ माकणीकर यांनी केले आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com