Top Post Ad

बिना मास्क, पहिल्या दिवशी ठाणे महापालिकेने वसूल केले ५८ हजार

मास्क  लावणा-याविरूद्ध पालिकेची कारवाई : पहिल्या दिवशी केला ५८ हजाराचा दंड वसूल


ठाणे 
विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या व्यक्तीविरूद्ध ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये आज एकूण ११६ व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई करून ५८ हजार रूपयांचा दंड वसूल केला. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.  गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये या ठिकाणी अनेक व्यक्ती विना मास्क संचार करतानाचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी  त्याबाबतचा आदेश काढला होता.


आदेशाच्या पहिल्याच दिवशी महापालिका हद्दीमध्ये विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एकूण ११६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतंर्गत एकूण ५८ हजार एवढा दंड वसूल करण्यात आला.  यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये १४ हजार दंड वसूल करण्यात आला. वर्तकनगरमधून ५५०० तर लोकमान्यनगर-सावरकर प्रभाग समितीमधून ४५०० दंड वसूल करण्यात आला. वागळे प्रभाग समितीमधून ३५००, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत १६५०० तर कळवा प्रभाग समितीमधून ४००० एवढा दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा  प्रभाग  समितीमध्ये या कारवाईमध्ये एकूण ४००० एवढा दंड वसूल केला तर दिवा प्रभाग समितीमध्ये एकूण ६००० एवढा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान  दंडात्मक कारवाई करताना नागरिकांशी योग्य संवाद साधून त्यांच्यामध्ये मास्क वापरण्याचे महत्व समजून सांगावे अशा स्पष्ट महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत.


 कोविड १९ चा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणा-याविरूद्ध ५०० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ११ सप्टेंबर रोजी घेतला होता. प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते.  ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये या ठिकाणी अनेक व्यक्ती विना मास्क संचार करतानाचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणा-या व्यक्तींकडून ५०० रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण व कर विभागाचे बीट निरीक्षक, बीट मुकादम त्याचप्रमाणे पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या कारवाई अंतर्गत विना मास्क पायी चालणा-या व दुचाकीवरून जाणा-या व्यक्तींकडून ५०० रूपये दंड वसूल करण्यात यावा असे असे आदेशात नमूद करण्यात आले होते.  दंडात्मक कारवाई करणे हा महापालिकेचा उद्देश नसून मास्कचा वापर बंधनकारक करणे हा असल्याने नागरिकांनी कोरोनाविरूद्धच्या लढाईमध्ये महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com