जिल्हा परिषद निधीतून साने गावच्या रस्त्याचे उद्घाटन संपन्न
शहापूर
शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत साने-पाली हद्दीतील रस्ता जिल्हा परिषद निधीतून मंजूर झाला असून या रस्त्याचे उदघाटन गुरुवारी सकाळी १०.३० वाजता शिवसेना ग्रामीण संघटक विश्वास पाटील यांचे शुभ हस्ते संपन्न झाले. हा रस्ता मंजूर करून घेण्यासाठी शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोने, पंचायत समिती सदस्या सोनल शिंगे यांचे विशेष सहकार्य लाभले असून या रस्त्यासाठी जिल्हा परिषद निधीतून दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. या प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख बाळाराम तरणे, विभाग प्रमुख राजदीप जामदार , ग्रामीण संघटक विश्वास पाटील, शहापूर तालुका सह- सचिव अविनाश जाधव साने शाखा प्रमुख सचिन भेरे, निलेश पाटील, सचिव संदीप पाटील, साने पाली ग्रुप ग्राम पंचायत सदस्य अनंता पाटील उपसरपंच काजल तरणे, अंगणवाडी सेविका कमल पाटील, विलास पाटील, सदानंद पाटील, अनंता भेरे, दशरथ पाटील, विजय पाटील , युवा कार्यकर्ते भरत पाटील, योगेश पाटील सागर पाटील, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

0 Comments