Top Post Ad

नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च करण्यात आलेले ठाण्यातील ५० टक्के सीसीटिव्ही कॅमेरे बंदच

नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च करण्यात आलेले ठाण्यातील ५० टक्के सीसीटिव्ही कॅमेरे बंदच



ठाणे
ठाणे शहराची डीजी ठाणे म्हणून ओळख निर्माण व्हावी याकरिता तसेच शहरातील कायदा सुव्यस्था आबादीत राहावी, शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाण्यात विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र मागील अनेक महि्न्यापासून त्यातील तब्बल ५० टक्के कॅमेरे बंद असल्याचा धक्कादायक आरोप नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी केला. दुसरीकडे वायफाय उपक्रम राबविणा-या ठेकेदाराने पालिकेचा हिस्सा अद्यापही दिला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांत केवळ तीन हजार रुपये जमा झाल्याचे समोर आल्याने नगरसेवकांनी याबाबतही नाराजी व्यक्त केली.  नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आला होता. परंतु हे कॅमेरे बंद पडल्याने त्याचा खर्च पाण्यात गेल्याची खंत नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केली.


ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षी प्रभाग सुधारणा निधीतून 1200, वायफाय योजनेतून 100 असे 1300 कॅमेरे शहरातील विविध रस्त्यांवर बसविण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी महापालिका आणि अन्य निधीतून 100 कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच अन्य 400 च्या आसपास कॅमेरे बसविण्यात येणार होते. शहरातील कायदा सुव्यस्था आबादीत राहावी, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला आळा बसावा तसेच शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु काही वर्षांपुर्वी मोठा गाजावाजा करत शहरभर लावलेले कॅमेरे बंद असल्याची बाब सातत्याने समोर येत असतानाच, आता शहरातील 50 टक्के कॅमेरे बंद असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी महासभेत केला आहे. सर्व पक्षीय नगरसेवकांनी हा मुद्दा उचलून धरत याला समर्थन दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1