मालमत्ता करामध्ये 10 टक्के सवलत योजनेस 30 सप्टेंबरपर्यत मुदतवाढ
कर भरण्यासाठी शनिवारी पूर्ण वेळ तर रविवारी अर्धा दिवस कार्यालये सुरू राहणार
ठाणे
कोविडची महामारी सुरू असतानाही ठाणे महानगरपालिकेच्या कर वसुलीस नागरिकांचा उत्स्फूर्त लक्षात घेता, मालमत्ता कराच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये 10 सूट योजनेस 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांना कर भरणे सोईचे व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेची प्रभागस्तरावरील सर्व कर संकलन केंद्रे व संलग्न कार्यालये 30 सप्टेंबरपर्यत शनिवारी पूर्ण वेळ व रविवारी अर्धा दिवस सुरू राहणार असून नागरिकांना याचा फायदा घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नमूद केले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील थकबाकीसह पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम महापालिकेकडे एकत्रित जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये (अग्निशमन कर वगळता) 10% सूट देण्यात येत आहे. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त करदात्यांना व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेची प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्रे व त्या संलग्न कार्यालये शनिवार दि. 19/09/2020 व दि. 26/09/2020 या दिवशी सकाळी 10.30 ते 5.00 या वेळेत त्याचप्रमाणे रविवार दि.20/09/2020 आणि 27/09/2020 रोजी सकाळी 10.30 ते 1.30 (अर्धा दिवस) या वेळेत कर संकलनाकरिता कार्यान्वित राहणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नमूद केले आहे.
0 टिप्पण्या