Top Post Ad

 चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना कलेच्या माध्यमातून मानवंदना ...

 चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना कलेच्या माध्यमातून मानवंदना ...उरण
     भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हे स्वातंत्र्य काही एका दिवसात मिळालेले नाही, यासाठी 150 वर्षे लढा करावा लागलेला होता. यातील एक महत्वाचे आंदोलन म्हणजे चिरनेर जंगल सत्याग्रह. या सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मृतींना   25 सप्टेंबर 2020 रोजी  90 वर्ष पूर्ण झाली. विद्यार्थी दशेतील 13 वर्षीय वरद खुशाली विलास या पिरकोन गावातील लहान चित्रकाराने आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना मानवंदना दिली आहे.  वरदने कोरोना काळातील सक्तीच्या विश्रांती पासून ते 3 सप्टेंबर 2020 या त्याच्या 13व्या वाढदिवसा पर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची 50 चित्रे पुर्ण करून भारतमातेसाठी ज्यांनी लढा देऊन आपणांस स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या थोर क्रांतिकारकांचे स्मरण घडवून आणले, विशेषतः पुढच्या पिढीला हा इतिहास फक्त पुस्तकातील रकाने न राहता देशाच्या निर्मितीचा आदर्श व्हावे, असा संदेश जणू त्याच्या चित्रकलेच्या छंदातून मिळत आहे. 


     पूर्वीचा कुलाबा आणि आजच्या रायगड जिल्ह्यातील चिरनेर या गावाजवळील अक्कादेवीच्या जंगलात 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह झाला. त्यावेळी पोलिसांनी जो स्वैर गोळीबार केला होता, त्यामुळे जंगल सत्याग्रहाकरीता जमलेल्या सत्याग्रहीं पैकी आठ सत्याग्रहींना आपला प्राण गमवावा लागला. त्या स्मृतींना आज 90 वर्षे पूर्ण होत आहेत. चिरनेर येथील हुतात्मा स्तंभाजवल 25 सप्टेंबर रोजी  जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते. वरद खुशाली विलास या पिरकोन गावातील विद्यार्थ्याने हुतात्मा आलू बेमट्या म्हात्रे - दिघोडे, हुतात्मा आनंदा माया पाटील - धाकटी जुई, हुतात्मा धाकू गवत्या फोफेरकर - चिरनेर,हुतात्मा नाग्या महादू कातकरी - चिरनेर, हुतात्मा रघुनाथ मोरेश्वर न्हावी - कोप्रोली, हुतात्मा रामा बामा कोळी - मोठी जुई, हुतात्मा हसुराम बुध्या पाटील - खोपटे, हुतात्मा परशुराम रामा पाटील - पाणदिवे या आठ हुतात्म्यांची चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न करून आपल्या विद्यार्थीदशेत कलेच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1