घुसखोर विकासक व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

घुसखोर विकासक व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीमुंबई 
गणेशवाडी कोंदविटा परिसरातील पॉकेट क्रमांक 5 इमारत 5 व 2 तर आंबेडकर नगर इमारत क्रमांक 5 मध्ये दुसरी लॉटरी सोडत करण्यात आली  यामध्ये तत्कालीन अभियंता यांचे संगनमताने बोगस लोकांची घुसखोरी करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. तरी संबंधित घुसखोरांना बाहेर काढून घुसखोर, दलाल, विकासक व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच पात्र झोपडीधारकांना सदनिकेचा ताबा द्यावा अन्यथा आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष व पँथर ऑफ सम्यक योद्धच्या संयुक्त विद्यमाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी उद्योग सारथीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


 गणेशवाडी, कोंडविटा व आंबेडकर नगर परिसरात झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत होत असलेल्या उपक्रमात मनमानी करून बोगस लोककांना सदनिकेत घुसविण्यात आले आहे, सुमारे 175 सदनिकेत बोगस लोकांना ताबा विना लॉटरी सोडत दिला असून पात्र झोपडीधारक हवालदिल झाले आहेत.  विकासक हे पात्र झोपडीधारकांना देय प्राप्त झाल्याखेरीज सदनिका विकू शकत नाही मात्र शासनाच्या या नियमाला विकासकाकडून तिलांजली देण्यात आली आहे. याबद्दल राज्य सचिव श्रावण गायकवाड यांनी असंतोष व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधावा, व त्याची कसून चौकशी करावी, भाजपा माजी नगरसेवक या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोपही श्रावण गायकवाड यांनी केला आहे तर तत्कालीन कार्यकारी अभियंता विकासकाचे अधिकारी व एमआयडीसी चे अधिकारी यात प्रामुख्याने गुन्हेगार असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.


    एमआयडीसी च्या शिफारसीने पोलिसांमार्फत योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा 144 कलम उठताच युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात, आणि पँथर ऑफ सम्यक योद्धा राष्ट्रीय अध्यक्ष पूज्य भदंत शिलबोधी यांच्या संयुक्त विदयमाने केंद्रीय महासचीव डॉ राजन माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य महासचिव पँथर श्रवण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्तिथीत लवकरच तीव्र आंदोलन उभारणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. गैरप्रकाराची महिती असूनदेखील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने एमआयडीसी प्रशासन अधिकाऱ्याला बांगडीचा आहेर देण्याचे आंदोलन लवकर करणार असल्याचा इशारा निवेदनामार्फत डॉ माकणीकर यांनी दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या