केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा.- खा. कपिल पाटील
ठाणे
केंद्र शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेणे व विभागांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती (दिशा) यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक १० सप्टेंबर रोजी समिती सभागृहात अॉनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी खा. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, प्रकल्प संचालक डॉ रूपाली सातपुते आदी उपस्थित होते. या बैठकीत प्रधानमंत्री सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना,स्मार्टसिटी, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री फसल विमा योजना, कृषी विकास योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, अमृत योजना, यांसह केंद्र शासनाच्या एकुण ३० योजनांचा आढावा घेण्यात आला. ठाणे जिल्ह्य़ात केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ अधिक लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनाने योजनेची प्रभावी आणि गांभीर्याने अंमलबजावणी करावी असे निर्देश यावेळी दिशा समितीचे अध्यक्ष खा. कपील पाटील यांनी दिले.
या योजनांची सद्यस्थिती तसेच अंमलबजावणीची माहिती अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आली.यासर्व विभागांनी दिलेल्या सुचनांचे पालन करुन लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा. या योजनांचा लाभ घेण्यासाठी जनजागृती करावी. तसेच प्रत्येक घटकांचा यामध्ये सहभाग वाढवावा अशा सुचना त्यांनी संबंधितांना दिल्या. तसेच पुढील माहिन्यात या सर्व योजनांची प्रत्यक्ष पाहणी आणि प्रत्येक विभागनिहाय व मनपा, नपा निहाय आढावा घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. महानगर पालिका आणि नगर परिषदांनी देखील केंद्राच्या योजनांबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी. टेलिकॉम, रेल्वे विषयीच्या योजनांची माहितीही मागवण्यात आली. तसेच या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रशासनाने अधिक गांभीर्याने ही कामे करावीत अशा सुचनाही पाटील यांनी केल्या. प्रकल्प संचालक डॉ रूपाली सातपुते यांनी प्रास्तविक केले.
0 टिप्पण्या