Top Post Ad

वासिंदमध्ये अँटीजन टेस्टचे आयोजन, शहापूरमध्ये कोरोना योद्धांचा सन्मान

वासिंदमध्ये अँटीजन टेस्ट कॅम्प ४३ पैकी १३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

शहापूर
शहापूर तालुका आरोग्य विभाग तसेच वासिंद येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या समनव्यातुन  जिल्हा परिषद शाळा वासिंद  येथे गुरुवारी अँटीजन टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.   या कॅम्पला शहापूर तालुका आरोग्य अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. गुरुवारी झालेल्या अँटीजन टेस्ट कॅम्पला चांगला प्रतिसाद लाभला असून या शिबिरात ४३ रुग्णांनी टेस्ट केल्या त्यापैकी १३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. देवळालकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ कुंदन वारघडे ,लॅब टेक्निशियन काळे तसेच वळवी, यांनी सर्व टेस्ट घेतल्या. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा वासिंद वार्ड क्रमांक २ चे नोडल अधिकारी राजेश निकम, वार्ड क्रमांक १ चे नोडल अधिकारी निशिकांत शेलार, अमोल गोरले, रंजिता दुपारे ,सुनील शेलार  यांनी विशेष मेहनत घेतली तर आशा वर्कर सविता शेलार, माजी उपसरपंच सागर कंठे,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाघमारे, पत्रकार कृष्णा शेलार, मोहन कंठे,mपरेश शेलार यांचेही सहकार्य लाभले असून हा कॅम्प यशस्वी झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेश निकम यांनी सांगितले. 


शहापूर 

मागील सहा महिन्यांपासून कोरोना संसर्गावर प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले आणि त्या दिवसापासून शहापूर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहापूर तालुक्यात कोरोना काळात सेवा दिलेल्या शहापुर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अस्थापनांमध्ये कार्य केलेल्या कर्मचारी अधिकारी वर्गाचा सन्मान म्हणून १० सप्टेंबर रोजी  सेवा देणाऱ्या शहापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्षा तथा तहसीलदार निलिमा साहेबराव सूर्यवंशी, शहापूर कोविड केयर सेंटर प्रमुख तथा उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. मनोहर विठ्ठलराव बनसोडे, शहापूर कोरोन्टाईन सेंटर प्रमुख तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता सुनिल धानके यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बहुजन समाज पार्टी शहापूर विधान सभा उपाध्यक्ष प्रदीप गायकर, महासचिव सिद्धार्थ साळवे, वासिंद शहर अध्यक्ष आनंद गायकवाड, महेंद्र भोईर आदी उपस्थित होते.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1