केंद्र सरकार विरोधात शेतकरी - कामगार संघटनांचा शहापुरात एल्गार
अखिल भारतीय किसानसभेच्या नेत्रुत्वाखाली जनसंघटनाची निदर्शने

शहापूर
शुक्रवारी केंद्र सरकारने ५ जुन रोजी पारित केलेल्या व नुकत्याच लोकसभेत समंत केलेल्या शेतकरी, कामगार विरोधी अध्यादेशा विरोधात किसानसभेच्या नेत्रुत्वाखाली गावपाड्यात व सिटु सघंटना असलेल्या अनेक कारखान्यांच्या गेटवर शाररिक अतंर राखत तसेच शहापुर तहसिलवर किसानसभेच्या नेत्रुत्वाखाली सिटु, जनवादी महीला संघटना, डि. वाय. एफ. आय., एस. एफ. आय या जनसघंटनांनी केद्रंसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवुन निदर्शने केली यावेळी शहापुरचे नायाब तहसीलदार वळवी यांना निवेदन देण्यात आले. शहापुर तालुक्यातील कोरोनोचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आंदोलन गावापाड्यांवर तसेच सिटुप्रणीत संघटना असलेल्या कारखान्यांच्या गेटवर शाररिक अंतर राखत विवीध ठिकाणी शेकडो कामगार शेतकरी यानी हजारोंच्या संख्येने निषेध नोंदवुन आंदोलन केले .याप्रसंगी माकपाचे सेक्रेटरी भरत वळंबा, किसानसभेचे तालुका अध्यक्ष क्रुष्णा भावर, सिटुचे राज्य कमिटी सदस्य विजय विशे, डिवायएफचे तालुका अध्यक्ष सुनिल करपट, एस.एफ.आय चे भास्कर म्हसे, प्रशांत महाजन ऊपस्थित होते
भाजपच्या केंद्र सरकारने शेती क्षेत्रासंबधी काढलेले तीन अध्यादेश मागे घ्या, ★वनाधिकार कायद्याची प्रभावीपणे अंलबजावणी करून अपात्र दावे पात्र करा व कमी श्रेत्र मिळालेले दावे परत तपासणी करून योग्य निर्णयाची अंमलबजावणी करा.. ★कामगार कायदे बदल रद्द करा. ★कोरोनो काळात आकारलेले विजबिल मागे घ्या ★कोरोनो काळात अनेक बेरोजगारांना मनरेगाची कामे काढुन रोजगार ऊपल्बध करा ★आँलाईन शिक्षण पद्धति बंद करा ★तालुक्यातील कंपन्या अंतर्गत युवक युवतींना 80%या प्रमाणात कायम कामगार म्हणून रोजगार द्या. ★ऊपजिल्हा रूग्णालयात डाँक्टरांची रिक्त पदे त्वरिच भरा व सिटी स्कँनमशिन, सोनोग्राफी सेवा त्वरित चालु करा! ★इस्पी ग्लास आठगाव या कंपनीतील कामावर येण्यापासुन रोखलेल्या भुमिपुत्र कामगारांना त्वरित कामावर घ्या. ★तालुक्यातील सर्व कंपन्या अस्थापनात काम करणार्या कायम, कंत्राटी कर्मचारी यांचा लाँकडाऊन कालावधीतील पगार चर्चा करून विनाविलंब मिळवुन देण्यात यावा.. ★सर्व रेशन दुकानांवर जिवनाव्श्यक वस्तु व राँकेल मिळाले पाहीजे. ★शिसवली, तलवाडा, गरेलपाडा गावचे विद्युतकरणाचे काम चालु करा. आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसिलदारांना देण्यात आले.
0 टिप्पण्या