डी एड पदवीधर शिक्षकांचे पाच सप्टेंबर शिक्षक दिनी लक्षणिक उपोषण


डी एड पदवीधर शिक्षकांचे पाच सप्टेंबर शिक्षक दिनी लक्षणिक उपोषण

 

शहापूर
माध्यमिक शाळेतील डी एड व्यावसायिक अर्हतेवर  सेवेत असणारा शिक्षक पदवी प्राप्त केल्यानतंर तो प्रशिक्षित पदवीधर होत असल्या कारणाने तो  १९८१च्या नियमावलीतील नियम १२ अनुसुची फ च्या परिच्छेद २ प्रवर्ग क साठी असलेल्या ४ मुद्दांचा व टिप १ ते १० चा वापर केल्यास डी एड शिक्षक पदवीप्राप्त तारखेला  प्रवर्ग क मध्ये जातो. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे  प्रवर्ग क च्या ४ मुद्दे व टिप १ ते १० चा वापर न करता सातत्याने डी एड पदवीधर शिक्षकांवर अन्याय होत आहे .

 

 हा अन्याय दूर करण्यासाठी  महाराष्ट्र  माध्यमिक डी एड शिक्षक महासंघाने  ९ आॅगष्ट क्रांती दिनी काळ्या फिती लावून आंदोलन करून मुख्यमंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदया व शिक्षण राज्य मंत्री महोदय तसेच अप्पर सचिव व आयुक्त महोदय यांना अनेक शिक्षकांनी ई मेल पाठवल्या . ५ सप्टेंबर हा शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस पण अनुसुची फ च्या योग्य कार्यवाहीच्या  अनुषांगाने न्यायासाठी शिक्षकांना एक दिवसाचे लक्षणिक उपोषण करावे लागते ही बाब खेदाची आहे. या उपोषणाद्वारे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेवून न्याय दयावा म्हणून हे लक्षणिक उपोषण महासंघाच्या अध्यक्षा पद्मा तायडे , सचिव बाळा आगलावे व कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांच्या नेतृवाखाली करण्यात येत आहे .अशी माहिती महासंघाचे मुबंई व कोकण विभागाचे सचिव काळूराम धनगर यांनी दिली. 

  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या