Top Post Ad

कल्याणफाटा व शीळफाटा जंक्शन उड्डाणपूल व कल्याण फाटा जंक्शन भुयारी मार्गाचे काम लवकरच

कल्याणफाटा व शीळफाटा जंक्शन उड्डाणपूल व कल्याण फाटा जंक्शन भुयारी मार्गाचे काम लवकरच


कल्याण
 भिवंडी-कल्याण-शीळ मार्गाचे सध्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणो अपेक्षित आहेत. मात्र वाहतूक कोंडीतील अडथळे लक्षात घेता कल्याणफाटा व शीळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल व कल्याण फाटा जंक्शन येथे भुयारी मार्ग करण्याची मागणी विचारात घेता त्याला मंजूरी मिळाली होती. या कामाची निविदा  १५ सप्टेंबर रोजी एमएमआरडीएने प्रसिद्ध केली आहे.  या कामाकरीता 195 कोटी 24 लाख रुपये खर्च होणार आहेत. कंत्रटदार निश्चीत करुन लवकर उड्डाण पूल व भुयारी जंक्शन मार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे. हे दोन्ही उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार झाल्यावर या परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर होण्यास बहुतांश मदत होणार आहे.


भिवंडी-कल्याण-शीळ हा मार्ग अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गे मुंब्रा बायपास मार्गे ठाणेमुंबईला जाता येते. तसेच भिवंडी बायपासमार्गे ठाणेमुंबई-नाशिक महामार्गावर पोहचता येते. त्याचबरोबर कल्याणहून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला जाता येते. नवी मुंबई पनवेल मार्गे पुढे गोवा महामार्गाला जाता येते. कल्याणठाणेनवी मुंबईतील कारखान्यात व सरकारी तसेच खाजगी कंपन्यांत कार्यालयात काम करणा:या चाकरमान्यांकरीता हा मार्ग महत्वाचा आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कल्याणफाटा व शीळ फाटा जंक्शन येथील उड्डाणपूल व कल्याण फाटा येथील भुयारी मार्ग महत्वाची कामगिरी पार पाडणार आहे. एमएमआरडीने निविदा प्रसिद्ध केल्याने  खासदार श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएच्या अधिका:यांच्या कामगिरीचे आभार व्यक्त केले  या कामाकरीता प्राप्त निविदापैकी योग्य तो कंत्रटदार लवकर निश्चीत करण्याची कामगिरी लवकर पाड पाडावी. जेणेकरुन या कामाची प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com