भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल- मंत्री वडेट्टीवार

भिवंडीतील इमारत दुर्घटनेचा मदत व  पुनर्वसन  मंत्र्यांनी घेतला आढावा

 

भिवंडी

भिवंडी इमारत दुर्घटनेचा  आपत्ती मदत व  पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन  संपूर्ण घटनेचा आढावा घेतला तसेच येथील मनपा आयुक्त पंकज आशिया आणि प्रांत अधिकारी तसेच एनडीआरएफ टीमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच इमारत कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेतलं. यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले  मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत देखील करण्यात येईल याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच जखमींना पन्नास हजार रुपये मदत त्यांनी यावेळी जाहीर केली. शिवाय इमारत कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. नोटीस  देऊन देखील  इमारत रिकामी का केली नाही याचीही चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग असल्याने त्याच्या व्हायब्रेशनमुळे हा प्रकार घडला का, या इमारतीमध्ये ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने इमारत कोसळली आहे का या सर्व गोष्टींची चौकशीही केली जाईल .भिवंडी इमारत दुर्घटना संदर्भात मंत्री मंडळ बैठकीत  योग्य तो निर्णय घेण्यात जाईल. सध्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच अटक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.   शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या विकासा बाबत निर्णय घेणे गरजेचे असून वाढीव चटई क्षेत्र मंजूर करणे ,पुनर्वसनाची व्यवस्था करणे याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA