Top Post Ad

‘झुठा है तेरा वादा’ भाजपची ठाण्यात  बॅनरबाजी

‘झुठा है तेरा वादा’ भाजपची ठाण्यात  बॅनरबाजी


ठाणे
५०० चौ. फुटांच्या घरांना अद्यापही करमाफी न दिल्याचा निषेध करीत ‘क्या हुवा तेरा वादा’ म्हणत असतांना भाजपने ठाण्यात सत्ताधा-यांच्या विरोधात  बॅनरबाजी केली आहे.  बॅनरवर ‘झुठा है तेरा वादा’… म्हणत सत्ताधारी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.  त्यामुळे आता शिवसेना याला काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  मागील काही दिवसापासून ठाण्यात जोरदार बॅनरबाजी सुरु झाली आहे. आधी सत्ताधा-यांनी बॅनरबाजी करुन आम्ही ठाणेकरांना काय दिले हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर याच बॅनरवरुन मनसे आणि भाजपने प्रतिउत्तर देत बॅनरबाजी केली होती.


काही दिवसांपूर्वी मनसेने ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा यासाठी महापालिकेसमोर आंदोलन केले होते. तर याच वेळेस भाजपने देखील शहरभर बॅनर लावत क्या हुवा देरा वादा म्हणत सत्ताधारी शिवसेनेला ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची आठवण करुन दिली होती. परंतु सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने तुर्तास करमाफी शक्य नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.  त्यानंतर आता अवघ्या काही दिवसातच शहरात पुन्हा भाजपने लावलेल्या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या बॅनवर सत्ताधारी शिवसेनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे.


‘झुठा है तेरा वादा…’ म्हणत शिवसेनेला महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने केलेल्या वचननाम्याची पुन्हा आठवण करुन देण्यात आली आहे. या बॅनरवर ५०० चौ. फुटांच्या घरांचा कर माफ केला नाही, वारेमाप पाणी बिलातून आणले डोळ्यात पाणी, पाण्याचा दर चौरस फुटावर ठरवून जिझीया कर लादणारी एकमेव महापालिका, जबरदस्त झटा देणारी वीजेची बिले असे काही मुद्दे मांडले असून अजब तुझे सरकार गजब तुझा कारभार अशी टिकाही या बॅनरद्वारे केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com