महागाई निर्देशांक नुसार शिष्यवृत्ती देण्याची नॅशनल स्टुडंट्स युनियनची मागणी

महागाई निर्देशांक नुसार शिष्यवृत्ती द्या-
नॅशनल स्टुडंट्स युनियन ची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी.

 

ठाणे

कोरोना च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकवर्ग एका मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.रोजमजुरी करून खाणाऱ्या शेतमजूर शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना यामुळं शिक्षण घेणं शक्य होणार नाही. आशा परिस्थितीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे  मंत्री म्हणून अनु. जाती जमाती करीता खलील नमूद केलेल्या उपयोजना लागू करण्याची विनंती नॅशनल स्टुडंट्स युनियन मार्फत करण्यात आली.

 

१.भारत सरकार शिष्यवृत्ती (GOI Sholership) महागाई निर्देशांक नुसार वाढवून देण्यात यावी. २.वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारा निर्वाह निधी (stipend) सुद्धा महागाई निर्देशांक प्रमाणेच वाढवून   देण्यात यावा.  ३.स्वाधार योजना चे पुनरमूल्यांकन करून तोही महागाई निर्देशांक विचारात घेऊनच निश्चित करण्यात यावा. ४.शिष्यवृत्ती साठी पात्र विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फिस वसूल करू नये असा शासन निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष नोडल अधिकारी ची नेमणूक करावी .  ५.समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच शिष्यवृत्ती तसेच फेलोशिप वेळेत मिळावी यासाठी विषेश लक्ष द्यावे.  आदी  मागण्यांचे निवेदन नॅशनल स्टुडंट्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष दादाराव नांगरे यांच्या मार्फत मेल द्वारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम,समाज कल्याण आयुक्त तसेच मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या